मराठी बातम्या /बातम्या /Viral /

फेसबुक LIVE करतानाच झाला भीषण अपघात, भयानक VIDEO आला समोर

फेसबुक LIVE करतानाच झाला भीषण अपघात, भयानक VIDEO आला समोर

160 किमीपेक्षा जास्त वेगाने चालवत होता गाडी, फेसबुक लाईव्ह सुरू असतानाच झाला भयानक अपघात.

160 किमीपेक्षा जास्त वेगाने चालवत होता गाडी, फेसबुक लाईव्ह सुरू असतानाच झाला भयानक अपघात.

160 किमीपेक्षा जास्त वेगाने चालवत होता गाडी, फेसबुक लाईव्ह सुरू असतानाच झाला भयानक अपघात.

  • Published by:  Priyanka Gawde

न्यूयॉर्क, 06 जानेवारी : जगात सर्वात जास्त अपघात हे हायवेवर स्पीडमध्ये गाडी चालवल्यामुळं होत आहेत. मात्र अमेरिकेत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका व्यक्तिनं अपघातापूर्वी स्वत:चा व्हिडीओ फेसबुक लाईव्ह केला. कारला अपघात होण्यापूर्वी या व्यक्तिने स्वत: वेगाने गाडी चालवतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. कनेक्टिकट राज्य पोलिसांनी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक माणूस हायवेवर वेगाने कार चालवत आहे. तो वाहतुकीदरम्यान ताशी 160 किमीपेक्षा वेगवान कार चालवत होता. व्हिडिओ दरम्यान, कॅमेरा त्याच्या कारच्या स्पीडोमीटरच्या दिशेने गेला, ज्याने त्यांची कार 100 मैल प्रतितास वेगाने जात असल्याचे दिसत आहे.

वाचा-भिकेचे डोहाळे लागलेल्या पाकनं 170 कोटींच्या टेस्ला कंपनीला दिले निमंत्रण

मात्र काही अंतर पुढे गेल्यानंतर त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडीचा अपघात झाला. व्हिडीओमध्ये हे दिसू शकते की कार पलटली आणि ती गंभीरपणे कोसळली. या कार अपघातात ड्रायव्हरला गंभीर दुखापत झाली नाही. एबीसी न्यूजच्या वृत्तानुसार, शनिवारी 23 वर्षीय हॉफलर गोल्ड स्टार मेमोरियल ब्रिजवर गाडी चालवत असताना हा अपघात झाला. अपघाताच्या वेळी पोलिस अधिकारी त्याच्या मागे जात होते.

वाचा-सारा अली खाननं शेअर केला आतापर्यंतचा सर्वात BOLD PHOTO, सोशल मीडियावर धुमाकूळ

वाचा-टाळ्यांच्या आवाजावर रोबोनं धरला ठेका, पाहा VIDEO

अपघाताचा व्हिडिओ अपलोड करताना राज्य पोलिसांनी फेसबुकवर लिहिले की, "एक व्यक्ति फेसबुकवर लाईव्ह करत गाडी चालवत होता आणि स्टार मेमोरियल ब्रिजजवळ पोहोचला. आम्ही ड्रायव्हरला गाडी थांबवण्यास सांगितले. सेफ्टी बेल्ट घातल्यामुळं वाहनचालकाचा जीव थोडक्यात वाचला. अन्यथा, त्याला गंभीर दुखापत झाली असती. कृपया हळू चालत राहा आणि सुरक्षितपणे गाडी चालवा. "

वाचा-36 लाख रुपये कमवण्याची सुवर्णसंधी! तुमच्या फोनमध्ये करावं लागेल 'हे' काम

फॉक्स न्यूजने सांगितले की क्रॅश दरम्यान हॉफलर 40 फूट अंतरावर पडला. कचर्‍याच्या बाहेर काढल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. हॉफलरवर आता निष्काळजीपणे वाहन चालविणे, निलंबित परवान्यासह वाहन चालविणे, परवान्याशिवाय कार चालवणे आणि ड्रग्ससह वाहन चालविणे असे आरोप आहेत.

First published: