मराठी बातम्या /बातम्या /Viral /

आई-मुलीची जबरदस्त जोडी, दोघींमधला फरकच ओळखता येईना; तुम्हीही पाहून व्हाल आश्चर्यचकित

आई-मुलीची जबरदस्त जोडी, दोघींमधला फरकच ओळखता येईना; तुम्हीही पाहून व्हाल आश्चर्यचकित

या अमेरिकन आईनं स्वत:ला इतकं मेंटेन्ड ठेवलं आहे की, पाहणारी प्रत्येक व्यक्ती आश्चर्यचकित होत आहे. जॉलीन डियाज असं या आईचं नाव आहे.

या अमेरिकन आईनं स्वत:ला इतकं मेंटेन्ड ठेवलं आहे की, पाहणारी प्रत्येक व्यक्ती आश्चर्यचकित होत आहे. जॉलीन डियाज असं या आईचं नाव आहे.

या अमेरिकन आईनं स्वत:ला इतकं मेंटेन्ड ठेवलं आहे की, पाहणारी प्रत्येक व्यक्ती आश्चर्यचकित होत आहे. जॉलीन डियाज असं या आईचं नाव आहे.

 कॅलिफोर्निया,16 डिसेंबर: असं म्हणतात, बाळंतपण (Childbirth) एका स्त्रीला पूर्णपणे बदलून टाकतं. आई (Mother) झाल्यानंतर बाळच त्या स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती ठरते. स्वत:च्या बाळाची काळजी घेण्यात स्त्रिया इतक्या गुंग होऊन जातात की त्यांचं स्वत:कडे लक्षही जात नाही. आपली काळजी घेण्यासाठी वापरला जाणारा सर्व वेळ त्या बाळाला देतात. त्यामुळं अनेकदा बाळंतपणापूर्वी एकदम स्टायलिश दिसणाऱ्या स्त्रिया बाळाच्या जन्मानंतर एकदम साध्या दिसू लागतात. मात्र, या परिस्थितीला काही स्त्रिया अपवाद ठरतात. मुलं कितीही मोठी झाली तरी त्यांच्या सौंदर्यामध्ये काहीही बदल दिसत नाही. सोप्या भाषेत सांगायच झालं तर, त्या अविवाहितच वाटतात किंवा त्यांना एवढी मोठी मुलं असतील असं त्यांच्याकडे पाहून वाटतंच नाही. अमेरिकेतील (America) कॅलिफोर्नियामध्ये (California) राहणारी आई आणि मुलीची (Mother and daughter) एक जोडी सध्या याच कारणामुळं चर्चेत आली आहे. दोघींचा एकत्र फोटो पाहिला तर, त्यातील आई कोणती आणि मुलगी कोणती हा फरकदेखील (Mother Looks Young as Daughter) ओळखता येत नाही. या अमेरिकन आईनं स्वत:ला इतकं मेंटेन्ड ठेवलं आहे की, पाहणारी प्रत्येक व्यक्ती आश्चर्यचकित होत आहे. जॉलीन डियाज असं या आईचं नाव आहे. हेही वाचा-  दारुची बाटली हातात घेऊन डॉक्टरांचा धांगडधिंगा, डान्सचा Live Video भलताच व्हायरल
 44 वर्षीय जॉलीन डियाज (Joleen Diaz) यांना मेलानी नावाची 21 वर्षांची एक मुलगी आहे. जेव्हा या मायलेकी सोबत असतात तेव्हा त्यांच्यातील आई कोणती आणि मुलगी कोणती हे ओळखणं कठीण होतं. जोपर्यंत त्या स्वत: सांगत नाहीत की कोण आई आहे आणि कोण मुलगी तोपर्यंत फरक लक्षातच येत नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जॉलीन आपल्या तरुण दिसण्याचा पुरेपुर फायदा करून घेते. ती अनेकदा आपल्या मुलीसोबत डेटवरदेखील जाते. त्या दोघी मायलेकी कमी आणि मैत्रीणीच जास्त वाटतात.
लोकांचा विश्वास बसत नाही जॉलीन (Joleen Diaz) सिंगल मदर (Single Mother) आहे. 14 वर्षांपूर्वी तीनं आपल्या पतीपासून घटस्फोट घेतलेला आहे. त्यानंतर सिंगल असलेल्या जॉलीननं डेटिंग साइट (Dating Site) वर आपलं प्रोफाईल ओपन केलं होतं. आजदेखील तिचं प्रोफाईल (Dating Profile) अॅक्टिव्ह आहे. डेटिंग साईटवर जॉलीनचं वय आणि फोटो पाहून पुरुष कन्फ्युज होतात. अनेकांनी तर प्रोफाईल फेक असल्याचं समजून ते रिपोर्टदेखील केलेलं आहे. त्यामुळे जॉलीनला आपलं अकाउंट बदलावं लागलं आहे. द सनच्या वृत्तानुसार, जॉलीनला हे सर्व खूप गमतीशीर वाटतं. तिला अनेकदा तिच्यापेक्षा लहान असलेल्या मुलांच्या रिक्वेस्ट येतात. त्यामुळं कधी-कधी ती अस्वस्थही होते. जॉलीनचे इन्स्टाग्रामवर पाच लाख 65 हजार फॉलोअर्स आहेत. मुलीसोबत जाते डेटवर जॉलीन आणि मेलानी यांच्यामध्ये 23 वर्षांचं अंतर आहे. तरीदेखील या मायलेकी एकमेकींची खूप चांगल्या प्रकारे कनेक्टेड आहेत. अनेकदा त्या दोघीजणी सोबत डेटवर जातात. मूव्ही पाहण्यासाठी, हायकिंग करण्यासाठी किंवा बॉलसाठी (डान्सपार्टी) त्या आपापल्या पार्टनर्सला घेऊन जातात. मात्र, तिथेही त्या सोबतच असतात. मेलानी अनेकदा आपल्या आईकडून सल्लाही घेते. जॉलीनच्या स्टनिंग लुक्समुळं (Stunning Looks) ती एका तरुण मुलीची आई आहे, यावर कुणाला विश्वासच बसत नाही. 'मला आपल्यापेक्षा वयानं लहान असलेल्या मुलांना डेट करण्यात अजिबात रस नाही. कारण, तिला स्वत:साठी एक पार्टनर पाहिजे आहे, टॉयबॉय नाही,' असं जॉलीन म्हणते. हेही वाचा-  पोलिसांच्या क्रूरतेचा VIDEO..!मुख्यमंत्र्यांना विरोध करणाऱ्या आंदोलनकर्त्यांच्या तोंडात कोंबला कपडा
 सध्या सोशल मीडियावर जॉलीन आणि मेलानी दोघींनाही मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली आहे. त्यांचे फोटो पाहून प्रत्येकजण आश्चर्य व्यक्त करत आहे.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: America, Viral photo

पुढील बातम्या