Home /News /viral /

भीती जेव्हा होते असह्य... बिथरलेली महिला डॉक्टरांना चावली

भीती जेव्हा होते असह्य... बिथरलेली महिला डॉक्टरांना चावली

खुर्चीवर तोंड आ करून तासनतास बसायचं आणि एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्या मौखिक आरोग्याची सवयींची चिकित्सा करते, हे सगळं अतिशय त्रासदायक असतं. रूट कॅनाल (Root canal), दात काढणे किंवा साफ करणे यात होणाऱ्या वेदनांमुळं तर या गोष्टी एखाद्या दुःखद स्वप्नासारख्या वाटतात.

पुढे वाचा ...
    मुंबई 5 मार्च: दंतचिकित्सक म्हणजेच दातांच्या डॉक्टरकडं (Dentist) जायचं म्हटलं की अनेकांच्या पोटात गोळा येतो. ती विशिष्ट खुर्ची, साधनं बघूनच भीती वाटायला लागते. त्यातही त्या खुर्चीवर तोंड आ करून तासनतास बसायचं आणि एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्या मौखिक आरोग्याची सवयींची चिकित्सा करते, हे सगळं अतिशय त्रासदायक असतं. रूट कॅनाल (Root canal), दात काढणे किंवा साफ करणे यात होणाऱ्या वेदनांमुळं तर या गोष्टी एखाद्या दुःखद स्वप्नासारख्या वाटतात; पण काही औषधांमुळं या वेदना सुसह्य होतात, ही बाब अतिशय दिलासादायक आहे. आपल्यापैकी बर्‍याचजणांच्या दाताच्या उपचारांवेळच्या आठवणी कधीच विसरण्याजोग्या नसतील. अशीच एक आठवण एका अमेरीकेतील महिलेनं सोशल मीडियावर(Social Media) शेअर केली असून, त्याला नेटीझन्सचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दशकभरापूर्वी घडलेली ही घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. युनिलॅडनं दिलेल्या वृत्तानुसार (UNIDAL), उत्तर कॅलिफोर्नियामधील (North California) 29 वर्षीय चेल्सीने 20 फेब्रुवारी रोजी ट्विटरवर (Twitter) आपला हा अनुभव शेअर केला आहे. ही घटना घडली तेव्हा ती 19 वर्षांची होती;पण आजही ती तो प्रसंग विसरू शकलेली नाही. चेल्सीला रूट कॅनाल करण्यासाठी दातांच्या डॉक्टरांकडे जायचं होतं. तत्पूर्वी तिला स्नायू शिथिल करण्यासाठीचे व्हॅलियम (Valium) हे औषध देण्यात आलं होतं. या औषधानेच सगळा घोळ घातला आणि चेल्सीनं जे काय केलं ते आजही तिला ओशाळवाणं वाटतं. व्हॅलियम हे उग्र औषध असल्यानं आणि चेल्सीचं वय कमी असल्यानं तिला या औषधाचा अर्धा डोसच देण्यास तिच्या आईला सांगण्यात आलं होतं, मात्र चुकून तिच्या आईनं तिला पूर्ण डोस दिला. त्यानंतर काही तासांनी ती तिच्या आईबरोबर कारमधून डॉक्टरांकडे गेली. त्यानंतर काय झालं हे तिला आठवत नाही; पण संध्याकाळी सात वाजता ती घरी सोफ्यावर झोपलेली होती आणि तिच्या तोंडावर टॉवेल होता, हे तिला चांगलं आठवत. डॉक्टरांकडे गेल्यावर चेल्सीनं काय गोंधळ घातला हे तिच्या आईनं तिला नंतर सांगितलं. डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये गेल्यानंतर चेल्सी त्या विशिष्ट खुर्चीवर बसली आणि ज्या क्षणी डॉक्टरांनी तिला तोंड उघडायला सांगितलं त्या क्षणी तिनं त्यांना घट्ट पकडून ठेवलं. त्यांनी तिचं तोंड उघडण्याचा प्रयत्न करताच तिनं चक्क त्यांचा (Bite) चावा घेतला. अखेर डॉक्टरांना तिच्या दातांवर तात्पुरता क्राऊन घालावा लागला. दातांची ट्रीटमेंट तशीच राहिली. आपण केलेला प्रताप ऐकल्यानंतर चेल्सीला इतकं लाजीरवाणं वाटलं की पुन्हा त्या डॉक्टरकडे जायचं नाही, असं तिनं ठरवलं.
    First published:

    Tags: Doctor contribution, Health, Health Tips

    पुढील बातम्या