मेकअप टिप्स देणाऱ्या या मुस्लीम TikTok स्टारचं अकाउंट केलं बंद; हा VIRAL VIDEO आहे कारण

मेकअप टिप्स देणाऱ्या या मुस्लीम TikTok स्टारचं अकाउंट केलं बंद; हा VIRAL VIDEO आहे कारण

फिरोजा अजीज नावाची ही अमेरिकन तरुणी TikTok वर ब्युटी टिप्स देते. तिचे व्हिडिओ प्रचंड लोकप्रिय असतात. तिने एक VIDEO शेअर केला आणि TikTok ने तिचं प्रोफाइलच सस्पेंड केलं.. काय आहे त्या व्हिडिओत? पाहा...

  • Share this:

न्यूयॉर्क (अमेरिका), 27 नोव्हेंबर : शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म म्हणून पुढे आलेल्या TikTok चा सध्या जोरदार बोलबाला आहे. आपल्या देशात तर Tik Tok बरंच लोकप्रिय आहे. अमेरिकेत राहणाऱ्या एका तरुण टिकटॉक स्टारला मात्र या व्हिडिओ प्लॅटफॉर्मकडून विचित्र अनुभव आला. फिरोजा अजीज नावाची ही अमेरिकन तरुणी TikTok वर ब्युटी टिप्स देते. तिचे व्हिडिओ प्रचंड लोकप्रिय असतात. तिने तिच्या एका व्हिडिओमध्ये चीनमध्ये उइगर मुस्लिमांवर कसे अत्याचार होत आहेत याविषयी सांगायचा प्रयत्न केला. चीनमध्ये हे मुस्लीम छळ छावण्यांमध्ये राहात आहेत. याविषयी जागृती करण्याचा तिचा प्रयत्न होता. हा व्हिडिओ बराच व्हायरल झाला.

पण व्हिडिओ लोकप्रिय होतोय हे कळताच काही तासातच फिरोजाचं अकाउंट बंद करण्यात आलं. टिकटॉकची पेरेंट कंपनी बाइट डान्स आहे. ही मुळात चिनी कंपनी आहे. म्हणूनच त्यांनी ही कारवाई केली.

वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, फिरोजा अजीजने मंगळवारी सकाळी अकाउंट अॅक्सेस करणयाचा प्रयत्न केला, तर तिला अॅक्सेस नाकारण्यात आला.

पाहा  - एका सेकंदात मुंगसानं मृत्यूला दिली मात; थरारक VIDEO VIRAL

तिचं प्रोफाइलही टिकटॉकच्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यात आलं होतं.

काय होतं त्या व्हिडिओत?

फिरोजाच्या ज्या व्हिडिओवरून हा वाद सुरू आहे, तो खरं तर एक ब्युटी टिप्स देणाराच व्हिडिओ आहे. पापण्या सुंदर कशा करायच्या? पापण्यांना शेप देण्याच्या उद्देशाने ती व्हिडिओची सुरुवात करते आणि सांगते, की आता जरा व्हिडिओ बघताय त्या मोबाईलवर चीनमध्ये काय चाललंय हे जाणून घ्या.

 

View this post on Instagram

 

Hi guys, I made a video about the situation in China with how the government is capturing the Uyghur Muslims and placing them into concentration camps. Once you enter these camps, you’re lucky if you get out. Innocent humans are being murdered, tortured, raped, receiving shock therapy, and so much more that I can’t even describe. They are holding a genocide against Muslims and they’re getting away with it. We need to spread awareness. I know it might sound useless, what can spreading awareness and talking about this even do? What are we supposed to do about it? We have our voices and technology to help us. Speak to those who can help! The UN failed to stop this genocide in the summer, we can’t let that happen again. We can’t be silent on another holocaust that is bound to happen. We can’t be another failed generation of “what could’ve, should’ve, would’ve”. We are strong people. We can do this. Only if we try #muslim #islam #tiktok #uyghurmuslims #china #freepalestine

A post shared by Feroza Aziz (@ferozzaaa) on

असं म्हणून फिरोजाने चीनमध्ये मुस्लिमांवर कसे अत्याचार होत आहेत याची माहिती दिली आहे. फिरोजा अजीज न्यूयॉर्कला राहते. तिने याविषयी आवाज उठवल्यावर अमेरिकन मीडियाने यासंबंधी बातम्या दिल्या. टिकटॉकने मात्र फिरोजा अजीजच्या या व्हिडिओमुळे तिला ब्लॉक केलं असल्याचा इन्कार केला आहे. टिकटॉकच्या प्रवक्त्याने एएफपीशी बोलताना सांगितलं की, "या प्रकरणात यूजरचं अकाउंट ब्लॉक केलेलं नाही. याच्या आधीचं अकाउंट तात्पुरतं बंद करण्यात आलं आहे. कारण तिने आधी इथे ओसामा बिन लादेनचा व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्या पोस्टमधून दहशतवादाशी संबंधित मजकूर शेअर होतो किंवा दहशतवादी संघटनांच्या कल्पनांवर आधारित व्हिडिओ शेअर केला, तर अशा आक्षेपार्ह व्हिडिओविरोधात आम्ही कारवाई करतो. तशी आमची पॉलिसी आहे."

वाचा - ‘पानीपत’च्या अडचणी वाढल्या, पेशव्यांसहित 48 सरदारांचे वारसदार पोहोचले कोर्टात

ता दें कि कथित तौर पर न्यूयॉर्क से ताल्लुक रखने वाली अज़ीज़ को इससे पहले भी टिकटॉक पर ब्लॉक किया जा चुका है. बहरहाल, टिकटॉक ने इस बात से इनकार किया कि उसके इस प्रोफाइल को ब्लॉक किया गया है.

(PTI आणि AFP च्या बातम्यांवर आधारित)

--------------------------------------------------

अन्य बातम्या

VIDEO : घागरा न घालताच सेटवर पोहोचली अभिनेत्री, दिग्दर्शकानं करुन दिली आठवण

अचानक घरात घुसला बिबट्या आणि कपाटावर चढून बसला; नगरजवळच्या घटनेचा थरार

ठाकरे घराण्याच्या या 'गृहमंत्र्यां'मुळे पूर्ण झालं बाळासाहेबांचं स्वप्न

लग्नाच्या वाढदिवसाआधीच प्रियांकाचं निकला स्पेशल गिफ्ट, घरी आला छोटा पाहुणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 27, 2019 03:23 PM IST

ताज्या बातम्या