मराठी बातम्या /बातम्या /Viral /अमेरिकन नेव्हीच्या अधिकाऱ्यांनी गायलं शाहरुखच्या सिनेमातील गाणं, VIDEO व्हायरल

अमेरिकन नेव्हीच्या अधिकाऱ्यांनी गायलं शाहरुखच्या सिनेमातील गाणं, VIDEO व्हायरल

अमेरिकेन नौदलाने (US navy) देखील भारताबरोबरचे संबंध आणखी घट्ट करण्यासाठी अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) याच्या  सिनेमातील गाण्याचा आधार घेतला आहे.

अमेरिकेन नौदलाने (US navy) देखील भारताबरोबरचे संबंध आणखी घट्ट करण्यासाठी अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) याच्या सिनेमातील गाण्याचा आधार घेतला आहे.

अमेरिकेन नौदलाने (US navy) देखील भारताबरोबरचे संबंध आणखी घट्ट करण्यासाठी अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) याच्या सिनेमातील गाण्याचा आधार घेतला आहे.

मुंबई, 29 मार्च : दोन देशांमधील संबंध चांगले करण्यासाठी साहित्य, सिनेमा आणि संगीत या माध्यमांचा आधार नेहमी घेतला जातो. अमेरिकेन नौदलाने (US navy) देखील भारताबरोबरच संबंध आणखी घट्ट करण्यासाठी अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) याच्या स्वदेश (Swades) सिनेमातील गाण्याचा आधार घेतला आहे.

अमेरिकन नौदलातील काही अधिकाऱ्यांनी 27 मार्च रोजी झालेल्या खास डिनरच्या वेळी 'स्वदेस' सिनेमातील 'ये जो देश है तेरा...' हे गाणं गायलं. या डिनरला अमेरिकेचे चीफ ऑफ नेव्हल ऑपरेशन्स (CNO) मायकल एम. गिल्डे आणि भारताचे राजदूत तरनजीत सिंह संधू उपस्थित होते.

संधू यांनी हे गाणं गात असलेल्या अमेरिकन अधिकाऱ्यांचा व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. 'हे मैत्रीचं बंध कोणीही तोडू शकत नाही' असं कॅप्शन संधू यांनी दिलं आहे. या व्हिडीओमध्ये अमेरिकन नौदलाचे काही अधिकारी युनिफॉर्ममध्ये हे गाणं गाताना दिसत आहेत.

या कार्यक्रमात भारत-अमेरिका संरक्षण संबंध आणखी मजबूत करण्याच्या विषयावर चर्चा झाली. त्यावेळी या गाण्याने सर्वांचं मन जिंकलं. संधू यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हंटले आहे की, 'अविस्मरणीय संध्याकाळ. यजमानपद भूषवल्याबद्दल यूएस सीएनओ एडमिरल गिल्डे यांचे धन्यवाद. भारत-अमेरिका यांच्यातील सहकार्य अधिक घट्ट करण्यासाठी एकत्र काम करण्यासाठी तत्पर आहे.'

( वाचा : पाकिस्तानात होळीला गालबोट, 100 वर्ष जुन्या मंदिरावर हल्ल्याची घटना उघड )

एम. गिल्डे यांनी देखील या संपूर्ण कार्यक्रमाबाबत त्यांची भावना व्यक्त केली आहे. 'भारत अमेरिका या दोन देशातील नौदलामध्ये समन्वय कायम राहिल यासाठी काम करण्यास मी कटीबद्ध आहे,' असं गिल्डे यांनी स्पष्ट केलं.

First published:

Tags: India america