मुंबई, 09 फेब्रुवारी : बहुतांश घरामध्ये लोक प्राणी पाळतात आणि प्राणी पाळणे हे अगदी सामान्य आहे. पण एका घरात इतकी धक्कादायक घटना घडली की ज्याबद्दल जाणून तुम्हालाही धक्का बसेल. खरंत न्यूयॉर्कमध्ये एका घरात नवरा बायकोचं शरीर मिळालं. तसेच त्या घरात 150 भुकेलेली मांजरं होती. ज्यामुळे फारच धक्कादायक प्रकार समोर आला.
ही बाब अमेरिकेतील न्युयॉर्कमधली आहे. परिसरातील नागरिकांना समजताच तेथे भीतीचे वातावरण पसरलं. त्या घरात काय झालं असेल असा प्रश्न लोकांना पडू लागला. आता तिथले अनेक फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.
हे ही पाहा : लोकांना मारुन ऍसिडमध्ये वितळवायचा, अखेर 16 वर्षानंतर पोलिसांकडून खेळ खल्लास
येथे स्थानिक पोलीस आणि प्राणी कल्याण संस्था (SPCA Westchester) टीमला घरात एक मृत जोडपे आणि 150 मांजरी दिसल्या. एसपीसीए वेस्टचेस्टरच्या सदस्यांच्या म्हणण्यानुसार, घरात सापडलेले मृतदेह पती-पत्नीचे आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मृत्यूनंतरही या दोघांच्याही शरीराला सुमारे दीडशे भुकेल्या मांजरींनी घेरले होते.
पोलिसांनी जेव्हा पाहिले तेव्हा त्यांना दिसते की घरातील मांजली उपासमारी आणि रोगांनी त्रस्त झाल्या होत्या. काही मांजरी जोडप्याच्या मृत शरीराभोवती बसल्या होत्या तर काही भिंतींवर चढण्याचा प्रयत्न करत होत्या. तर काही मांजरी मरुन पडल्या होत्या. या घटनेबद्दल अॅनिमल वेल्फेअर ऑर्गनायझेशनच्या इंस्टाग्राम पेजवर असे सांगण्यात आले की, मांजरी त्या गलिच्छ घरात घाणीत राहत होत्या, त्यांच्यासाठी अन्न नव्हते. घराच्या भिंती आणि छतासह प्रत्येक खोलीत अनेक मांजरी अडकल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी या मांजरींची सुटका केली.
View this post on Instagram
पोलिसांनी अद्याप मृत जोडप्याची ओळख उघड केलेली नाही. मात्र, एसपीसीए वेस्टचेस्टरने प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांनंतर अनेकांचे लक्ष या घटनेकडे गेले आहे. ऍनिमल वेल्फेअर ऑर्गनायझेशनच्या पोस्टनुसार, हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या पोलीस तपासात गुंतले आहेत.
ऍनिमल वेल्फेअर ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार, खोलीतील काही मांजरींना त्वचेचा संसर्ग झाला होता, काहींच्या डोळ्यांना संसर्ग झाला होता, तर काही मांजरी कुपोषण आणि निर्जलीकरणाच्याही बळी ठरल्या होत्या. त्यांची अशी अवस्था पाहून त्या कित्येक दिवस घरात कोंडून असाव्यात असा अंदाज बांधला गेला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking, Social media, Social media trends, Viral