मराठी बातम्या /बातम्या /Viral /

रस्त्यावरुन जाताना महिलेच्या खिशात अनोळखी व्यक्तीनं टाकली चिठ्ठी; मजकूर वाचताच बसला धक्का

रस्त्यावरुन जाताना महिलेच्या खिशात अनोळखी व्यक्तीनं टाकली चिठ्ठी; मजकूर वाचताच बसला धक्का

चॅनीस दोन लहान मुलींसोबत बस पकडण्यासाठी जात होती. तिच्या मागून रस्त्यानं एक वयस्कर व्यक्ती आला आणि तिला स्पर्श करत खिशात एक चिठ्ठी टाकून गेला.

चॅनीस दोन लहान मुलींसोबत बस पकडण्यासाठी जात होती. तिच्या मागून रस्त्यानं एक वयस्कर व्यक्ती आला आणि तिला स्पर्श करत खिशात एक चिठ्ठी टाकून गेला.

चॅनीस दोन लहान मुलींसोबत बस पकडण्यासाठी जात होती. तिच्या मागून रस्त्यानं एक वयस्कर व्यक्ती आला आणि तिला स्पर्श करत खिशात एक चिठ्ठी टाकून गेला.

    नवी दिल्ली 17 ऑक्टोबर : काही विचित्र मानसिकतेच्या लोकांमुळे महिलांना रस्त्यानं एकटं चालायलाही (Woman walking on road) भीती वाटते. यामुळे लोक त्यांना घरातून एकटं बाहेर न पडण्याचा सल्ला देतात. अशा अनेक घटना सतत समोर येत राहतात, ज्यात एकटं फिरणाऱ्या महिलेला कोणीतरी घाबरवलं किंवा छेडछाड केलेली असते. नुकतंच एका महिलेला असाच विचित्र अनुभव (Weird Experience) आला, जेव्हा ती आपली मुलगी आणि भाचीसोबत रस्त्यानं चालली होती. ब्रिटनच्या ग्लेनथ्रोत्समध्ये राहणारी 21 वर्षीय चॅनीस विल्सन एक दिवस आपली मुलगी आणि भाची यांच्यासोबत रस्त्यावरुन जात होती. इतक्यात मागून एक अनोळखी व्यक्ती आला आणि चॅनीसला स्पर्श करत तो पुढे निघून गेला. काही वेळानंतर चॅनीसला दिसलं, की तिच्या खिशामध्ये एक चिठ्ठी आहे. बापरे! प्रायव्हेट पार्टच शरीरावेगळा केला; शार्कचा भयंकर हल्ला, तरुणाचा मृत्यू द मिररनं दिलेल्या वृत्तानुसार, चॅनीस दोन लहान मुलींसोबत बस पकडण्यासाठी जात होती. तिच्या मागून रस्त्यानं एक वयस्कर व्यक्ती आला आणि तिला स्पर्श करत खिशात एक चिठ्ठी टाकून गेला. यानंतर त्यानं चॅनीसच्या भाचीलाही उचलून कडेवर घेतलं. मात्र, चॅनीसनं दोन्ही मुलींना लगेचच हात पकडून स्वतःकडे खेचलं, यानंतर तो व्यक्ती निघून गेला. महिलेनं जेव्हा चिठ्ठी उघडून पाहिली, तेव्हा यात या व्यक्तीचं नाव आणि नंबर होता. त्यानं यात महिलेला सवाल केला होता, की माझ्यासोबत संबंध ठेवशील का? महिलेने दिला साडेसहा किलो वजनाच्या मुलाला जन्म, ऑर्डर करावं लागलं स्पेशल डायपर महिलेनं सांगितलं, की मी माझ्या आईची वाट बघत होते. आम्ही अनेक दुकानांमध्ये गेलो, सामान पाहिलं. मात्र, मी नोटीस केलं की एक व्यक्ती आमचा पाठलाग करत आहे. मी ज्या दुकानात जाईल, तिथे तो माझ्या मागे येत होता. महिलेनं दोन्ही मुलींचे हात पकडलेले होते. या व्यक्तीनं काही काळासाठी यातील एकीला आपल्या कडेवर घेतलं आणि नंतर तिला खाली ठेवत तो महिलेला स्पर्श करत तिथून निघून गेला. त्यानं महिलेच्या पॅन्टच्या मागील खिशात एक चिठ्ठी टाकली होती. जेव्हा महिलेनं त्याला विचारलं की हे काय आहे, तेव्हा त्यानं म्हटलं की उघडून बघ. महिलेनं आपल्यासोबत घडलेल्या या घटनेचा अनुभव फेसबुक पोस्टच्या माध्यमातून शेअर केला आहे. तिनं पोलिसांतही तक्रार दिली असून तपास सुरू आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Shocking news, Viral news

    पुढील बातम्या