कोरोना विषाणूच्या (Coronavirus) वाढत्या रुग्णसंख्येदरम्यान अनेक राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. सरकारने नागरिकांना नियमांंचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. पोलिसांनी याबाबत कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. जे लोक घराबाहेर जातात, त्यांना शिक्षा दिली जात आहे. असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. येथे पोलीस अधिकाऱ्याने दोन तरुणांना अनोखी शिक्षा शिक्षा (Police Officer Gives Unique Punishment) दिली आहे. त्यांनी दोन तरुणांकडून घरात राहा, सुरक्षित राहा असं लिहून घेतलं आहे. सोशल मीडियावर (Social Media) याचा एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे.
मध्यप्रदेशातील (MP) सीधीमध्ये (Sidhi) पोलीस अधिकारी भगवत प्रसाद पांडे (Bhagwat Prasad Pandey) यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून तो खूप व्हायरल होत आहे. ते आपल्या अंदाजात नियम तोडणाऱ्यांना शिक्षा देतात. यंदा त्यांनी दोन तरुणांकडून संपूर्ण वहीभर 'घरात राहा, सुरक्षित राहा' असं लिहायला सांगितलं. या तरुणांनी 4 तासांपर्यंत 44 पानांच्या वहीत 'घरात राहा, सुरक्षित राहा' असं लिहून काढलं आहे. कोरोनाचा कर्फ्यू तोडण्याची शिक्षा तरुणांना अशा प्रकारे देण्यात आली आहे.
हे ही वाचा-VIDEO : लपून-छपून सुरू होती लग्नाची खरेदी; पोलिसांनी शटर उघडताच धू धू धुतलं
हा व्हिडिओ त्यांनी 30 एप्रिल रोजी यूट्यूबवर शेअर केला होता, ज्याला आतापर्यंत 1 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. आयपीएस अधिकारी दीपांशू काबरा यांनाही याचं कौतुक केलं आहे. त्यांनी लिहिलं आहे की, विनाकारण घराबाहेर फिरण्यापेक्षा घरात बसून थोडा फार अभ्यास करावा. लोकांना हा व्हिडिओ आवडला असून ट्विटरवरही हा व्हिडिओ प्रसिद्ध होत आहे. मारहाण करण्यापेक्षा त्यांना प्रेमाने समजावता येऊ शकतं. तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिलं आहे की, प्रेमाने काम होत असेल तर तलवाराची काय गरज?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona spread, Lockdown, Viral video.