Home /News /viral /

तीन शब्दांच्या राजीनाम्याची सोशल मीडियावर चर्चा, पत्रात असं लिहिलं तरी काय? वाचा

तीन शब्दांच्या राजीनाम्याची सोशल मीडियावर चर्चा, पत्रात असं लिहिलं तरी काय? वाचा

तीन शब्दांच्या राजीनाम्याची सोशल मीडियावर चर्चा, पत्रात असं लिहिलं तरी काय? वाचा

तीन शब्दांच्या राजीनाम्याची सोशल मीडियावर चर्चा, पत्रात असं लिहिलं तरी काय? वाचा

राजीनाम्याचं कारण शक्य तितक्या पटेल अशा शब्दांत सांगताना, स्वतःची प्रतिमा बिघडू नये, हेही पाहतात. सध्या राजीनाम्याचं एक अनोखं पत्र सोशल माध्यमांवर गाजतंय. पाहा काय लिहिलंय पत्रात.

मुंबई, 16 जून: नोकरी ही आपल्या आयुष्यातील महत्त्वाची बाब असते. भांडवल खर्च न करता, मर्यादित जबाबदारी स्वीकारून मर्यादित काम करायचं आणि महिनाअखेरीस ठराविक रक्कम मिळवायची ही कल्पना पटल्याने नोकरी करणारे अनेक जण असतात. पण कधीकधी नोकरी सोडण्याची वेळ येते. नोकरीचा राजीनामा देताना कर्मचारी खूप विचार करतात. राजीनाम्याचं पत्र (Resignation Letter) कसं लिहावं, याबाबतही अनेकजण खूप संवेदनशील असतात. जुन्या कंपनीतील वरिष्ठांशी असलेले संबंध खराब होऊ नयेत, यासाठी विशेष काळजी ते घेतात. राजीनाम्याचं कारण शक्य तितक्या पटेल अशा शब्दांत सांगताना, स्वतःची प्रतिमा बिघडू नये, हेही पाहतात. सध्या राजीनाम्याचं एक अनोखं पत्र सोशल माध्यमांवर गाजतंय. या पत्रात केवळ तीन शब्द आहेत, ‘बाय बाय सर.’ (Bye Bye Sir.) सोशल मीडियात या पत्राला लोकांनी डोक्यावर घेतलंय. त्याविषयी आज तकनं सविस्तर वृत्त दिलं आहे. राजीनाम्याचं हे पत्र ट्विटरवर (Twitter) शेअर करण्यात आलं आहे. @MBSVUDU या नावानं ते शेअर करत सिंपल असं त्यासोबत लिहिलं आहे. या पत्रात केवळ तीनच शब्द (Three Words Resignation Letter) आहेत, ते म्हणजे ‘बाय बाय सर’ खाली त्या व्यक्तीने आपला विश्वासू म्हणून सहीसुद्धा केली आहे. या छोट्याशा राजीनामापत्राचं सगळ्यांनी कौतुक केलंय, तर काहींनी हे खूप गमतीशीर असल्याचं म्हटलंय. जवळपास 2 लाख लोकांनी हे ट्विट लाईक केलंय, तर 60 हजार युजर्सनी ते रिट्विट केलंय. यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय. एकानं लिहिलंय, ‘किमान अजून हे फॉर्मल आहे.’ ‘हे इतकं साधं आणि स्पष्ट लिहिलंय, की कोणालाही काही समजवून सांगण्याची आवश्यकता नाही,’ असं लिहित दुसऱ्यानं प्रतिक्रिया दिलीय. तर तिसऱ्यानं हे पत्र एकदम मुद्देसूद असल्याचं म्हटलंय. हेही वाचा - शाळा सुरू होताच सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय हा Video; असं काय आहे यात तुम्हीच पाहा हे राजीनामापत्र सोशल माध्यमात खूप व्हायरल झालं. काहींनी या पत्रावर प्रतिक्रिया म्हणून वेगवेगळ्या प्रकारची गंमतीशीर राजीनामापत्रं (Funny Resignation Letters) शेअर केली आहेत. त्यातील एका पत्रात लिहिलंय, ‘डिअर सर, मजा नही आ रहा.’ दुसऱ्यानं तर एक मीम शेअर केला आहे, त्यात म्हटलं आहे, ‘ डिअर सर, बस यही तक था, जो था.’ या मीममध्ये एका वेबसीरिजमधील फोटोही जोडला आहे. तिसऱ्यानं एक फोटो शेअर केला आहे. त्यात म्हटलं होतं, ‘सॉरी फॉर यूवर लॉस. इट्स मी, आय एम द लॉस.’ ट्विटरवर या राजीनामापत्राची बरीच चर्चा झाली. अशा प्रकारचं साधं, सोपं तरीही स्पष्ट असं पत्र असावं, असं बऱ्याच जणांनी म्हटलंय. अनेकांना असं स्पष्ट बोलणं जमत नाही. कधीकधी प्रतिमा चांगली राखण्यासाठीही गोड शब्दांत राजीनामापत्र लिहिलं जातं. याचा अनुभव अनेकांनी घेतला असेल, म्हणूनच कदाचित या भन्नाट राजीनामापत्राला सोशल मीडियावर इतके लाईक्स मिळाले आहेत. लोकांच्या दैनंदिन जगण्याशी निगडित काही इंटरेस्टिंग गोष्टींना सोशल माध्यमात खूप लाइक्स मिळतात. त्यावरून लोकांची मतंही कळतात. या तीन शब्दांच्या राजीनामापत्राचंही असंच काहीसं झालंय.
First published:

Tags: Photo viral, Viral news

पुढील बातम्या