मुंबई, 08 सप्टेंबर : गाडीचा आकार मोठा असला की सगळीकडे पार्किंगसाठी प्रश्न निर्माण होतो. अनेकदा तर मोठ्या गाड्यांसाठी जागाही मिळत नाही. काहीवेळा जागेवरून वाद होतात किंवा रस्त्यावर गाडी पार्क केली तर उचलण्याची भीती असते किंवा रस्त्यावरची जागा कमी झाल्यानं अडचण होते याशिवाय गाडीला धोका असतोच तो वेगळा. या सगळ्या कटकटींवर एका तरुणानं भन्नाट उपाय शोधून काढला आहे.
सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून एक भारी व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अगदी कमी जागेत मोठी पार्क केलेली कार योग्य कौशल्य दाखवत एका तरुण बाहेर काढतो आहे. अगदी कमी जागेतही नीट गाडी पार्क करणं आणि तिथून पुन्हा नीट रस्त्यावर आणणं यासाठी कौशल्याएवढाच आत्मविश्वासही असावा लागतो असं कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे.
हा व्हिडीओ आतापर्यंत सोशल मीडियावर 842.9 हजार लोकांनी पाहिला आहे. तर 7 हजारहून अधिक लोकांनी रिट्वीट केला आहे. एक हजार लोकांनी यावर अनेक कमेंट्स केल्या आहेत. ही कार चालकानं पार्क कशी केली असेल असाही प्रश्न अनेक युझर्ना पडला आहे. या व्हिडीओची सोशल मीडियावर मात्र तुफान चर्चा आहे.
कार पार्किंगचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात पण अशा भन्नाट आणि जोखिम असणाऱ्या व्हिडीओची मात्र सोशल मीडियावर सध्या चर्चा सुरू आहे.