मराठी बातम्या /बातम्या /Viral /तरुणीच्या जबरदस्त डान्सनं लावली पाण्यात 'आग'; पाहा खास अंडरवॉटर Dance Video

तरुणीच्या जबरदस्त डान्सनं लावली पाण्यात 'आग'; पाहा खास अंडरवॉटर Dance Video

इंटरनेटवर अनेक डान्स व्हिडिओ उपलब्ध आहेत. मात्र, तुम्ही कधी कोणाला पाण्यात डान्स करताना पाहिलं आहे का?

इंटरनेटवर अनेक डान्स व्हिडिओ उपलब्ध आहेत. मात्र, तुम्ही कधी कोणाला पाण्यात डान्स करताना पाहिलं आहे का?

इंटरनेटवर अनेक डान्स व्हिडिओ उपलब्ध आहेत. मात्र, तुम्ही कधी कोणाला पाण्यात डान्स करताना पाहिलं आहे का?

नवी दिल्ली 29 जुलै : सोशल मीडियावर (Social Media) दररोज नवनवे व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. काही व्हिडिओ इतके मजेशीर असतात की ते पाहून हसू आवरता येत नाही. मात्र, काही व्हिडिओ इतके इमोशनल असतात की ते पाहताच डोळ्यातून पाणी येतं. यासोबतच अनेक लोकं आपले डान्सिंग (Dancing), कुकींग, सिंगिंगचे व्हिडिओदेखील (Singing Video) सोशल मीडियावर शेअर करत असतात. याला नेटकऱ्यांची चांगली पसंतीही मिळते. असाच एका महिलेचा अंडरवॉटर डान्स व्हिडिओ (Underwater Dance Video) सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

काळजाचा ठोका चुकवेल हा VIDEO! दूधसागर रोरावत ट्रेनवर कोसळला, निम्मी ट्रेन गायब

इंटरनेटवर अनेक डान्स व्हिडिओ उपलब्ध आहेत. मात्र, तुम्ही कधी कोणाला पाण्यात डान्स करताना पाहिलं आहे का? एका टॅलेन्टेड महिलेचा असा एक अंडरवॉटर डान्स व्हिडिओ सध्या समोर आला आहे. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जिमनास्ट क्रिस्टीना माकुशेंको (Kristina Makushenko) अगदी सहजपणे पाण्यात डान्स करताना दिसत आहे. क्रिस्टीनाचा हा अंडरवॉटर डान्स पाहून तुम्हीही हैराण व्हाल.

... आणि 20 वर्षांचं आयुष्य त्याच्या स्मृतीतून अचानक पुसलं गेलं! नेमकं घडलं काय?

क्रिस्टीना अनेकदा आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पाण्यातील डान्सचे व्हिडिओ शेअर करताना दिसते. 26 वर्षीय क्रिस्टीना हिनं 2011 मध्ये यूरोपीय जूनिअर चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्ण पदकं जिंकली आहेत. ती लोकप्रिय गाण्यांवर अंडरवॉटर डान्स करून चांगलीच प्रसिद्धीझोतात आली आहे. सोशल मीडियावर लोकांना तिचे डान्स व्हिडिओ चांगलेच आवडतात. लोक तिचे व्हिडिओ शेअर करण्यासोबतच व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंटही करतात.

First published:
top videos

    Tags: Dance video, Video viral