Home /News /viral /

VIDEO : अबब! तब्बल 3 क्विंटलचे कुलूप; अलिगढच्या वृद्ध दाम्पत्याची कमाल

VIDEO : अबब! तब्बल 3 क्विंटलचे कुलूप; अलिगढच्या वृद्ध दाम्पत्याची कमाल

उत्तर प्रदेशातील अलिगढ हे कुलुपांसाठी प्रसिद्ध आहे. एकापेक्षा एक मजबूत कुलुपं इथं बनवली जातात.

अलिगढ, 18 मार्च: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) अलिगढ (Aligarh) हे कुलुपांसाठी (Lock) प्रसिद्ध आहे. एकापेक्षा एक मजबूत कुलुपं इथं बनवली जातात. मजबूतीसाठी इथल्या कुलुपांचे उदाहरण दिलं जातं. सध्या इथल्या एका अजब कुलुपानं आणि ते बनवणाऱ्या ज्येष्ठ कारागीर दाम्पत्यानं (Senior Citizen Pair) सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या दाम्पत्यानं चक्क तीन क्विंटल (three Quintal Weight) वजनाचं, 6 फूट लांबीचं आणि दहा लिव्हर असलेलं एक मोठं कुलूप निर्माण केलं आहे. त्यांच्या या कुलुपाची सर्वत्र चर्चा होत असून, सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हे आगळंवेगळं कुलूप बनविणाऱ्या दाम्पत्याचं नाव आहे सत्यप्रकाश शर्मा (Satya prakash Sharma) आणि रुक्मिणीदेवी शर्मा( Rukmini Devi Sharma). अलिगढमधील ज्वालापुरी भागातील 5 नंबरच्या गल्लीत हे कुटुंब राहतं. सत्यप्रकाश हे लहानपणापासून आपल्या वडिलांबरोबर कुलूप बनविण्याच्या (Lock Making) व्यवसायात कार्यरत होते. एक अतिशय भव्य कुलूप बनवण्याचं त्याचं स्वप्न होतं. कुलुपांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या अलिगढच्या सन्मानात आणखी भर घालण्यासाठी असं आगळंवेगळं कुलूप बनवण्याचं त्याचं ध्येय होत. लहानपणापासून बाळगलेलं हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी त्यांना प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली, मात्र त्यांनी हार मानली नव्हती. अखेर वृद्धावस्था जवळ आल्यानंतर त्यांचं हे स्वप्न पूर्णत्वाला गेलं. हे कुलूप घडवण्यासाठी मोठ्या आर्थिक निधीची गरज होती. ती पूर्ण करण्यासाठी सत्यप्रकाश शर्मा यांच्या पत्नी रुक्मिणीदेवी यांनी त्यांना मदत केली. घरातल्या अन्य सदस्यांचीही त्यांना साथ मिळाली. सर्वांच्या सहकार्यानं या दोघांनी घरातच हे भव्य कुलूप निर्माण केलं. यासाठी 60 किलो पितळ धातूचा वापर करण्यात आला आहे. याची वैशिष्ट्यपूर्ण चावी आणि दहा लिव्हर्स हे याचं मुख्य आकर्षण आहे. या दाम्पत्याची जिद्द आणि अथक मेहनत यातून अखेर हे तीन क्विंटल वजनाचं कुलूप साकार झालं आहे. (हे वाचा:  पर्यटकांच्या गाडीवर धावून आला अवाढव्य हत्ती आणि... धडकी भरवणारा VIDEO VIRAL) सत्यप्रकाश शर्मा आणि रुक्मिणीदेवी शर्मा या ज्येष्ठ दाम्पत्यानं बनवलेल्या या महाकाय कुलुपाची सर्वत्र चर्चा सुरू असून, लोक त्यांच्या कारागिरीची, चिकाटीची प्रशंसा करत आहेत. एखादं स्वप्न बघणं आणि वृद्धापकाळीदेखील चिकाटीनं त्याचा पाठपुरावा करून ते सत्यात आणणं हे खरोखरचं अत्यंत कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे. या ज्येष्ठ दाम्पत्याच्या या कलाकृतीनं अलिगढच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला असून, सत्यप्रकाश यांची इच्छा सफल झाली आहे. https://hindi.news18.com/news/uttar-pradesh/aligarh-elderly-couple-made-a-unique-big-lock-of-3-quintal-weight-watch-video-3521153.html
First published:

Tags: Uttar pradesh

पुढील बातम्या