कीव्ह, 15 डिसेंबर : भारतासह (India) जगभरात अनेक देशांमध्ये सध्या हिवाळा (Winter) ऋतू सुरु आहे. हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात बर्फ पडत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सध्या युक्रेनमधील (Ukraine) एक व्हिडीओ व्हायरल (Viral video) होत असून यामध्ये हिवाळ्याच्या दिवसांमध्ये नागरिकांना कशा पद्धतीने बर्फामुळे अडचणींचा सामना करावा लागतो आहे ते या व्हायरल व्हिडीओत पाहायला मिळतंय. या व्हिडीओमधील (video footage) एक महिला फुटपाथवरून चालत असताना बर्फावरून घसरताना दिसतेय. परंतु रस्त्यावरील इतर नागरिक अगदी आरामात चालत असताना या महिलेला मात्र या बर्फावरून चालण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
RTE एजन्सीने यासंदर्भातील हा मजेशीर व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये या महिलेची कसरत दिसून येत आहे. या व्हीडीओमध्ये इतर नागरिक अगदी आरामात रस्ता पार करतात. पण ही महिला मात्र रस्ता पार करण्याचा प्रयत्न करताना वारंवार घसरून खाली येताना दिसतेय. 1 मिनिटाच्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती या महिलेला मदतही करताना दिसतेय. पण या महिलेला या रस्त्यावर चालण्यात अपयश येत आहे. हा व्हिडीओ ट्विट केल्यानंतर आतापर्यंत 11 मिलियन लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत.
युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये (KYIV) मोठ्या प्रमाणात बर्फ (ice storm) पडल्याने शहरातील जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं आहेत. या बर्फाचा अनेक ठिकाणी मोठा थर साचला असून गाड्या, रस्त्यांवरही बर्फ साचला आहे. गल्फ टुडेच्या वृत्तानुसार, युक्रेनियमधील आपातकालीन सेवांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील शनिवारी आणि रविवारी युक्रेनमध्ये 1,435 अपघात नोंदवले गेले आहेत. त्यापैकी 84 अपघातांमध्ये जखमींची नोंद आहे. देशाची राजधानी कीवमध्ये 503 अपघातांची नोंद झाली असून 7 अपघातांमध्ये मृत्यू आणि जखमी झाल्याची नोंद झाली आहे.
CCTV footage captured in Kyiv, Ukraine yesterday shows people struggling to walk downhill due to ice covering the street in the city centre. Over 4,000 sweepers were deployed to remove the ice from the city streets. pic.twitter.com/yhmpTWqb5I
— RTÉ News (@rtenews) December 11, 2020
दरम्यान, न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, शहरातील रस्त्यांवरील बर्फ काढण्यासाठी 4,000 सफाई कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. स्थानिक नागरिकांसाठी हे रस्ते धोकादायक झाले असून हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.