मराठी बातम्या /बातम्या /Viral /फोटो काढला सात जणींचा! पण आठवा चेहरा कोणाचा? हे भूत तर नाही ना...

फोटो काढला सात जणींचा! पण आठवा चेहरा कोणाचा? हे भूत तर नाही ना...

सात जणींचाच फोटो काढलेला असताना ही भलतीच व्यक्ती फोटोत कशी आली, यावरून रिबेका घाबरली असून, ते भूत असावं, या भीतीने तिची गाळण उडाली आहे.

सात जणींचाच फोटो काढलेला असताना ही भलतीच व्यक्ती फोटोत कशी आली, यावरून रिबेका घाबरली असून, ते भूत असावं, या भीतीने तिची गाळण उडाली आहे.

सात जणींचाच फोटो काढलेला असताना ही भलतीच व्यक्ती फोटोत कशी आली, यावरून रिबेका घाबरली असून, ते भूत असावं, या भीतीने तिची गाळण उडाली आहे.

    मुंबई 27 मे: तुम्ही मित्र-मैत्रिणींचा एक ग्रुप फोटो काढलाय आणि तो फोटो नंतर बघताना तुम्हाला त्या ग्रुपमध्ये नसलेलं आणि भीतिदायक कोणी त्या फोटोत दिसलं तर? घाबरगुंडी उडेल ना! तशीच घाबरगुंडी उडालीय इंग्लंडमधल्या (England) कॉव्हेंट्री सिटीमधल्या रिबेका ग्लासबोरो (Rebecca Glasborrow) नावाच्या एका महिलेची. तिने तिच्या मैत्रिणींसमवेत त्यांच्या बिल्डिंगमध्ये घरात केलेल्या पार्टीमध्ये एक फोटो काढला होता. त्यात त्या सात जणींव्यतिरिक्त एक भीतिदायक महिलाही (Scary Face) दिसत आहे. 'मिरर न्यूज'ने दिलेल्या माहितीनुसार, ही पार्टी गेल्या ऑक्टोबरमध्ये झाली होती. सात जणींचाच फोटो काढलेला असताना ही भलतीच व्यक्ती फोटोत कशी आली, यावरून रिबेका घाबरली असून, ते भूत असावं, या भीतीने तिची गाळण उडाली आहे.

    या घटनेनंतर रिबेका नीट झोपू शकलेली नाही. ज्या घरात ही पार्टी झाली होती, त्या घरातल्या बाथरूममध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता, अशी एक अफवाही तिच्या कानावर पडली. त्यानंतर ती अख्खी बिल्डिंगच भुताने झपाटलेली (Haunted Building) आहे की काय, अशी भीती तिला वाटू लागली आहे.

    'हा असा फोटो आहे, की जो पाहून अंगभर एक शिरशिरी दाटून येते. तो खूप भीतिदायक आहे,' अशा भावना रिबेकाने मिरर न्यूजकडे व्यक्त केल्या. फोटोमधल्या सात जणी हातातले ग्लासेस उंचावून फोटोसाठी पोझ देत असल्याचं फोटोत दिसत आहे. त्यांच्या पाठीमागे लांब केसांचा एक भीतिदायक चेहराही (Ghost) असल्याचं दिसत आहे.

    हा फोटो ज्या घरात काढला गेला, त्या घराच्या वरच्याच मजल्यावर 30 वर्षांची रिबेका राहते. फोटो हातात आल्यावर घाबरलेल्या सात जणींनी सर्वत्र शोध सुरू केला; मात्र त्यांना काहीच सापडलं नाही. 'हे काय आहे, याची आम्हाला खरंच कल्पना नाही. लांब, ब्राउन रंगाचे केस असलेली ती महिला असावी, असं आम्हाला फोटोत पाहून वाटतं; पण आमच्यासभोवती तसं कोणी नसतानाही केवळ फोटोतच ते दिसत आहे. हे खरंच विचित्र आहे,' असं रिबेकाने सांगितलं.

    रिबेकाच्या शेजाऱ्यांनी तिच्या मनातले वाईट विचार काढून टाकून सकारात्मक विचार आणण्यासाठी प्रयत्न केले. 'तिने मेलेल्या व्यक्तींपेक्षा जिवंत व्यक्तींची भीती बाळगली पाहिजे,' असं त्यांनी तिला सांगितलं. रिबेका मात्र अद्याप त्या घटनेतून बाहेर येऊ शकलेली नाही. रात्रीच्या वेळी अजूनही तिच्या मनात विचार येतात, की तिच्या बेडरूममध्ये काही काळ्या आकृत्या प्रवेश करत आहेत. 'रात्रीस चाललेल्या या खेळां'मुळे तिची झोप उडते.

    First published:
    top videos

      Tags: PHOTOS VIRAL, Shocking news