विमानात दोन महिलांनी केलं लाज वाटण्यासारखं कृत्य; लोक म्हणाले, डर्टी

विमानात दोन महिलांनी केलं लाज वाटण्यासारखं कृत्य; लोक म्हणाले, डर्टी

विमानातून प्रवास करणाऱ्या दोन महिलांचं लाज वाटण्यासारखं कृत्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल चर्चेत आलं आहे..

  • Share this:

नवी दिल्ली, 21 मार्च : सार्वजनिक ठिकाणी वावरत असताना काही गोष्टींचं भान लोकांना असायला हवं. म्हणजे आपल्या कोणत्या वागण्याने इतर लोकांना त्रास होणार नाही याची काळजी हवीच. पण काही लोकांना याचं भान नसतं. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत  आहे. विमान प्रवास करणाऱ्या दोन महिलांचा फोटो असून त्यांच्यामुळे सहप्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. महिलांचं हे कृत्य एखाद्याला लाज आणेल असंच आहे.

डेली स्टारने एक बातमी दिली आहे. त्यानुसार इन्स्टाग्रामवर एका युजरनं फोटो शेअर केला आहे. विमानात इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करणाऱ्यांचा हा फोटो आहे. यामध्ये महिला त्यांचे दोन्ही पाय पुढच्या सीटवर ठेवून झोपल्या असल्याचं दिसतं. फोटो शेअर करणाऱ्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव विमान, महिला यांची ओळख आणि माहिती दिलेली नाही. तसंच फोटो शेअर करताना असं न करण्याचं आवाहनही केलं आहे.

सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्यानंतर दोन्ही महिलांची खिल्ली उडवली जात आहे. काही लोकांनी म्हटलं आहे की, अशा प्रवाशांसाठी एअरलाइन्सने नियम तयार केले पाहिजेत. असं करणाऱ्यांवर दंड आकारला पाहिजे असंही म्हटलं आहे.

काही युजर्सनी या फोटोवर डर्टी पीपल, नेस्टी अशा शब्दांत कमेंट केल्या आहेत. महिलांनी केलेलं हे कृत्य अशोभनीय असून सहप्रवाशांना त्रास देणारं असल्याचंही काही युजर्सनी म्हटलं आहे.

हे वाचा : 16 महिन्यांची चिमुकली झोपेत रडायची, CCTV तून समोर आली धक्कादायक गोष्ट

First published: March 21, 2020, 7:58 PM IST
Tags: Airplane

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading