मराठी बातम्या /बातम्या /Viral /मादीसाठी दोन विषारी सापांमध्ये झाली तुफान लढाई, पाहा थरारक VIDEO

मादीसाठी दोन विषारी सापांमध्ये झाली तुफान लढाई, पाहा थरारक VIDEO

या व्हिडीओमध्ये साप एका मादीसाठी दोघं भांडत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 2 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

या व्हिडीओमध्ये साप एका मादीसाठी दोघं भांडत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 2 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

या व्हिडीओमध्ये साप एका मादीसाठी दोघं भांडत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 2 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

    नवी दिल्ली, 06 जानेवारी : सोशल मीडियावर(Social Media) प्राण्यांच्या विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये काहीवेळा प्राण्यांची फाईट सुरु असते तर काहीवेळा मस्ती सुरु असते. सध्या सोशल मीडियावर 2 सापांची लढाई सुरु असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत असून यामध्ये या दोन सापांची भयंकर लढाई होताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियन वाइल्डलाइफ कन्झर्व्हन्सीने(AWC) अलीकडेच त्यांच्या फेसबुक पेजवर एक हा व्हीडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये दोन विषारी सापांनी एकमेकांना पिळा घातला असून त्यांच्यात भांडणं सुरू आहेत.

    या व्हिडीओतील हे साप एकमेकांना पुन्हा पुन्हा मारहाण करण्याचा प्रयत्न करत आहेत. वन्यप्रेमींनी या व्हीडिओ मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे. ऑस्ट्रेलियन वन्यजीव संरक्षण संस्थेच्या मते, सापांची ही लढाई मरे-डार्लिंग बेसिनमधील त्यांच्या स्कॉटिया वन्यजीव अभयारण्यात समोर आली आहे. या जंगलातली अधिवासामध्ये आपले सामर्थ्य दाखवण्यासाठी आणि मादी सापाबरोबर संबंध ठेवण्यासाठी ही लढाई सुरु असल्याचं देखील यामध्ये म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियन वाइल्डलाइफ कंझर्व्हेंसीने (AWC) हा व्हीडिओ शेअर करताना असं लिहलं आहे की, “हे दोन्ही साप स्कोटिया वन्यजीव अभयारण्यात( Scotia Wildlife Sanctuary) एका तासापेक्षा जास्त वेळापासून भांडण करत आहेत. यावेळी तेथील इकोलॉजिस्ट ताली मोयले(Tali Moyle) यांनी याविषयी बोलताना म्हटले, सापांच्या प्रजननाचा लोखंड सुरु झाला असून या कालावधीत स्त्री सापाबरोबर संबंध ठेवण्यासाठी दोन सापांमध्ये संघर्ष होण्याच्या घटना घडत असतात. खरेतर मुळगा जातीचे हे साप शांत असतात आणि कधीही अशा प्रकारे लढाई करत. या पद्धतीचा त्यांनी केवळ दुसराच व्हिडीओ पहिला असून या काळात सापांमध्ये लढाई होणे सर्वसाधारण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

    हा व्हिडीओ आतापर्यंत 2 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. इतकंच नाही तर यावर 300 हून अधिक लोकांनी कमेंट्सही केल्या आहेत. काही युजर्सनी यावर प्रतिक्रिया देताना हे खूपच वाईट स्वप्न असल्याचं म्हटलं आहे. तर एकाने हे साप उभे राहून भांडत असल्याचे पाहून आश्चर्य वाटत असल्याचं म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियामधील सगळ्या सापांच्या प्रजातीमध्ये मुळगा सापाचं(Mulga Snake) सगळ्यात जास्त व्यापक वितरण होतं. जवळजवळ संपूर्ण खंडात हे साप आढळतात. ऑस्ट्रेलियन संग्रहालयाच्या मते, या सापांच्या प्रजातींचे पुरुष एकमेकांशी कुस्ती करतात.

    हे वाचा-OMG! छोट्याशा कारवरून नेल्या डजनभर सायकली, नेमका काय आहे जुगाड वाचा

    जवळपास 65 हजार हेक्टरवर हे अभयारण्य असून यामध्ये कोल्हा आणि अन्य मोठ्या वन्यजीवांसाठी 8 हजार हेक्टर तर ऑस्ट्रेलियामध्ये धोक्यात असलेल्या इतर वन्यजीव प्राण्यांसाठी देखील मोठी जागा आहे.

    दरम्यान, काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील पेंच अभयारण्यातील (Pench Wildlife Sanctuary) दोन वाघांच्या लढाईचा देखील व्हिडीओ व्हायरल झाला होता. या पद्धतीचे व्हीडीओ काही नवीन नाहीत. अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मध्य प्रदेशातील वाघांचा हा व्हिडीओ कुणी पर्यटकाने युट्युबवर टाकल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

    First published:

    Tags: Viral videos