मराठी बातम्या /बातम्या /Viral /Video Viral : ढोलचा आवाज ऐकताच काकू Uncontrolled थेट जमीनीवर झोपल्या आणि...

Video Viral : ढोलचा आवाज ऐकताच काकू Uncontrolled थेट जमीनीवर झोपल्या आणि...

व्हायरल व्हि़डीओ

व्हायरल व्हि़डीओ

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 08 फेब्रुवारी : भारतात कोणताही कार्यक्रम नाचगाण्याशिवाय अधुरा आहे. लग्न असोत, बारसा, कुणाचा वाढदिवस किंवा आणखी काही, गाणं लावलं नाही, तर मजाच नाही. त्यात असे काही मंडळी हे सगळीकडे नक्कीच पाहायला मिळतात, जे कोणतंही गाणं किंवा म्यूजिक ऐकून भान सोडून नाचू लागतात.

सोशल मीडियावर सध्या एक असाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये दोन महिला या सगळं टेन्शन विसरुन आणि जगाची पर्वा सोडून नाचण्यात गुंग झाले आहेत. या दोन महिलांनी ढोलच्या तालावर ठेका करला आणि थेट सुरुच झाले.

हे ही पाहा : महिला सोन्याचं पैंजण का घालत नाही? पैसेच नाही तर त्यामागे आणखी बरीच कारणं

हा व्हिडीओ दीपक नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत ढोल-ताशे वाजवले जात असून अनेक लोक त्यांच्यासमोर उभे असल्याचे दिसत आहे. यादरम्यान काही लोक ढोल-ताशांच्या तालावर नाचू लागले, त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या काही महिला नाचण्यासाठी पुढे आल्या. काकूंनी नाचायला सुरुवात करताच तिथले लोक दूर गेले. यानंतर या दोन्ही काकूंनी हद्दच पार केली. त्या थेट रस्त्यावर झोपल्या आणि नाचायला लागल्या.

त्यांचा हा डान्स खूपच मजेदार आहे. ज्यामुळे जो कोणी त्यांचा डान्स पाहात आहे. तो पोट धरुन हसू लागला आहे.

त्यांचा डान्स पाहण्यासाठी आजूबाजूला लोक जमले. तिथे उपस्थित काही लोकांना या महिलांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पण त्या थांबायला तयार नव्हत्या. मीडिया रिपोर्टनुसार, नंतर या महिलांना तेथून हटवण्यात आले. तसेच ढोल देखील थांबवण्यात आले.

अनेक लोकांनी या महिलेला ट्रोल देखील केलं आहे. असा डान्स करण्यापेक्षा तो न केलेलाच बरा असं देखील अनेकांचं म्हणणं आहे.

First published:

Tags: Shocking, Social media, Top trending, Videos viral, Viral