दोन वाघांमध्ये झाली WWF, पाहा दुर्मीळ लढाईचा VIDEO

दोन वाघांमध्ये झाली WWF, पाहा दुर्मीळ लढाईचा VIDEO

टायगर 57 आणि टायगर 58 यांच्यात जोरदार हाणामारी झाली.

  • Share this:

मुंबई, 24 ऑगस्ट : गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर वाघ, बिबट्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. कधी खेळताना तर कधी शिकार करता तर कधी एका मादीसाठी लढताना. बिबट्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतानाच वाघांच्या लढाईनं मात्र सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

राजस्थानातील सवाई माधोपूर येथील रणथंभोर नॅशनल पार्कमधील टायगर 57 आणि टायगर 58 यांच्यात जोरदार हाणामारी झाली. तिथल्या पर्यटकांनी हा व्हिडीओ शूट केला आहे. एका वाघिणीसाठी हे दोन वाघ भांडल्याची माहिती समोर आली आहे.

हे वाचा-विमान सोडा आता बसमधून करा थेट लंडनपर्यंतचा प्रवास! येणार इतका खर्च

हा व्हिडीओ IFS प्रवीण कासवान यांनी एक वर्षापूर्वी शेअर केला होता. आता पुन्हा एकदा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. T57 आणि T58 मध्ये तुफान लढाई झाली. ही लढाई वाघिणीवरून झाल्याची माहिती मिळत आहे. या दोघांमधली लढाई पाहून तिथून वाघिणी मात्र निघून जाते हे दोघं भांडत राहतात. या हाणामारीमध्ये कोणत्याही वाघाला गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली नाही. हा व्हिडीओ पुन्हा एकदा रमेश पांडे यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 24, 2020, 11:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading