गोल्फ कोर्स झालं डान्सफ्लोअर, 2 सापांचा Dance Video व्हायरल

आतापर्यंत 9 लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

आतापर्यंत 9 लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

  • Share this:
    मुंबई, 14 मार्च : एका गोल्फ कोर्सच्या कोपऱ्या दोन सापांच्या डान्सचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियार खूप व्हायरल होताना दिसत आहे. अवघ्या 36 सेकंदांच्या या व्हिडीओमुळे सर्वजण हैराण झाले आहे. वसुधा वर्मा नावाच्या एका ट्विटर युजरनं तिच्या ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. आतापर्यंत 9 लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये दोन साप डान्स करताना दिसत आहेत. वसुधा वर्मा यांनी हा व्हिडीओ शेर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, गोल्फ कोर्सचा एक कोपरा डान्स फ्लोअर झाला आहे. हे खूपच सुंदर आणि संतुलित आहे... हे एक नैसर्गिक सौंदर्य आहे. त्यांनी काही इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस अधिकाऱ्यांना टॅग केलं आहे. हा व्हिडीओ ट्विटर युजर्सच्या पसंतीस उतरला आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सच्या कमेंट पाहायला मिळत आहेत. VIDEO : किती गोड! 2 वर्षांच्या चिमुकलीचे हावभाव पाहून तुम्हीही पडाल तिच्या प्रेम काही युजर्सनी याला नागिन डान्स म्हटलं आहे तर एका युजरनं लिहिलं, दोन साप प्रजनन करत आहेत आपण त्याच्या खासगी आयुष्याचा मान राखायला हवा. तर काहींनी याला सापांची लढाई असं म्हटलं आहे. या व्हिडीओवर आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी कमेंट केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की हे कोब्रा नाहीत तर रॅट स्नेक आहेत. Smithsonian या मासिकानं दिलेल्या माहितीनुसार दोन साप जेव्हा एकामेकांना बिलगून असतात. तेव्हा नेहमीच त्याचा अर्थ ते संभोग करत असतात असा होत नाही. नर रॅट स्नेक नेहमीच एकमेकांसोबत डान्स करत असतात. ज्याद्वारे ते एकमेकांना वश करण्याचा प्रयत्न करतात. धावणाऱ्या हत्तीवर निर्दयीपणे चालवली गोळी, VIRAL VIDEO पाहून भडकला रणदीप हुड्डा
    First published: