मराठी बातम्या /बातम्या /Viral /

एकमेकींच्या झिंझ्या उपटून जमिनीवर आपटलं, भररस्त्यात आजीबाईंची जबरदस्त फायटिंग; VIDEO VIRAL

एकमेकींच्या झिंझ्या उपटून जमिनीवर आपटलं, भररस्त्यात आजीबाईंची जबरदस्त फायटिंग; VIDEO VIRAL

आजींची फायटिंग पाहून तुम्हाला WWE नक्कीच आठवेल.

आजींची फायटिंग पाहून तुम्हाला WWE नक्कीच आठवेल.

आजींची फायटिंग पाहून तुम्हाला WWE नक्कीच आठवेल.

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 22 ऑक्टोबर : महिलांची भांडणं (Woman fighting) तशी आपल्यासाठी नवीन नाहीत. मग ती भांडणं पाण्यावरून असो किंवा लोकलमध्ये प्रवास करताना असो (Woman fighting video). महिला भांडायला लागल्या (Fight between woman) की कुणाचंच काही ऐकत नाही (Woman fight). अगदी एकमेकींवर त्या तुटून पडतात. पण तुम्ही कधी वृद्ध महिलांना असं भांडताना पाहिलं आहे का? (Old woman fighting video) अशाच आजीबाईंच्या फायटिंगचा व्हिडीओ (Fighting video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. दोन वयस्कर महिलांमध्ये तुफान फायटिंग झाली आहे. व्हिडीओ पाहून प्रत्येक जण थक्क झाला आहे. व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला दोन वृद्ध महिलांमध्ये वाद सुरू आहेत. वादाचं रूपांतर हाणामारीत होतं. दोघीही सुरुवातीला एकमेकींचा गळ्यावर हात टाकतात. त्यानंतर एकमेकींच्या झिंझ्या उपटतात. एकमेकींना मारता मारता त्या जमिनीवर पडतात. दोघीही एकमेकींना जमिनीवर आपटतात.
funnyvideos1377 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून तुम्हाला WWE नक्कीच आठवला असेल. एका युझरनेही या महिलांना WWE मध्ये पाठवा अशी कमेंट दिली आहे. या वयातही आजींचा जोश पाहून सर्वजण शॉक झाले आहे. या दोन्ही आजींनी तर कमालच केली, याआधी मी असा व्हिडीओ कधीच पाहिला नाही, अशी प्रतिक्रिया एका युझरने दिली आहे. हे वाचा - VIDEO : एका हातात मान धरली आणि सटासट मारत गेली; भररस्त्यात तरुणींची फ्री-स्टाईल हाणामारी याआधी वयस्कर पुरुषांचाही फायटिंग व्हिडीओ व्हायरल झाला होता. भररस्त्यात तीन वयस्कर वयक्ती आपसात भिडले. तिघंही एकमेकांवर भारी पडले.  सुरुवातीला दोन व्यक्ती आपसात भांडत असतात. एकमेकांना ढकलतात. इतक्यात तिसरी व्यक्ती तिथं येते आणि ती एका व्यक्तीला ढकलते. मग काय तिघांमध्ये फायटिंग सुरू होते. आधी ते एकमेकांना ढकलत असतात. पण हळूहळू ही फायटिंग चांगलीच रंगते. तिघंही एकमेकांना जमिनीवर आपटतात आणि लाथाबुक्के मारू लागतात.  तीनपैकी दोन व्यक्ती तिसऱ्याविरोधात लढताना दिसतात. हे वाचा - लाथा मारल्या, झिंज्या उपटल्या! भररस्त्यातच तरुणींचं 'ढिशूम ढिशूम'; Fighting video viral वाढत्या वयानुसार शारीरिक आणि आरोग्याच्याही समस्या बळावतात. शरीर थकतं, नीट चालणंही होत नाही. अशात फायटिंग तर दूरचीच गोष्ट. पण या आजीआजोबांनी मात्र वय हा फक्त आकडा आहे हे दाखवून दिलं आहे. वय वाढलं तरी त्यांच्यातील जोश तरुणांसारखाच आहे.
First published:

Tags: Funny video, Viral, Viral videos

पुढील बातम्या