दोन बछड्यांचं भांडण मिटवण्यासाठी धावून आली आई, पुढे काय झालं तुम्हीच पाहा VIDEO

दोन बछड्यांचं भांडण मिटवण्यासाठी धावून आली आई, पुढे काय झालं तुम्हीच पाहा VIDEO

एका मादीसाठी दोन वाघ भांडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा दोन वाघांच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

  • Share this:

14 फेब्रुवारी: एका मादीसाठी दोन वाघ भांडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा दोन वाघांच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. दोन्ही वाघांच्या भांडणार वाघीण म्हणजे त्यांची आई पडली आणि तिथे दोघांनाही मस्ती करत असतानाचा आईनं दम भरला आणि दोघांनाही शांत बसायला सांगितलं. सोशल मीडियावर तिघांचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. फॉरेस्ट ऑफिसर सुशांत नंदा यांनी हा व्हिडिओ ट्वीट केला आहे. त्यांचा हा ट्वीट केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

फायनल गुडबाय असं कॅप्शन देऊन त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. दोन वाघांची आईला सोडून जाण्याची वेळ आली आहे. 18 महिन्यांचे होईपर्यंत बछडा आईजवळ राहातो. त्यानंतर त्याने आपलं क्षेत्र निर्माण करायचं असतं. असं कॅप्शन लिहून हा व्हिडिओ ट्वीट केला आहे. दोन वाघांमध्ये झालेल्या भांडणार आईमध्ये आल्यावर काय झालं तुम्हीच पाहा.

हेही वाचा-मुजरा! राज्यभरात व्हायरल होतंय हे TikTok Whatsapp status

30 सेकंदाचा असलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत दीड हजारहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे तर 400 युझर्सनी कमेंट केल्या आहेत.

असाच आणखी एक व्हिडिओ त्यांनी ट्वीट केला आहे. यामध्ये ट्रकमध्ये असलेले हत्ती शेजारी उभ्या असलेल्या ट्रकमधील उस खात असल्याचं दिसत आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 2.4 हजार लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून लाईक केला आहे. तर 11.4 हजार लोकांनी हा व्हिडिओ रिट्विट केला आहे.

हेही वाचा-VIDEO:आजीबाई रॉक्स! 72 वर्षांच्या आजींचा 'हाय रे तेरी फोटो' गाण्यावर तुफान डान्स

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 14, 2020 12:35 PM IST

ताज्या बातम्या