मुंबई, 15 मे : जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं लोकांच्या मनात काहीस भीतीचं वातावरण आहे. याच काळात अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये अगदी मजुरांचे होणारे हाल ते लॉकडाऊनमधल्या वेळेचा वापर कसा कराल इथपर्यंत वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडीओचा समावेश आहे. याच दरम्यान काही मनोरंजन करणारे आणि निखळ आनंद देणारे व्हिडीओही व्हायरल होत आहेत.
सध्या दोन चिमुकल्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. व्हिडीओमध्ये दोन लहान मुलं गार्डनमध्ये ऑरेंज सोड्याची बाटली घेऊन उभी आहेत. दोघंही जोरजोरात हसत आहेत आणि मधेच बाटलीतला सोडा पीत आहेत. ऑरेंज सोडा पिण्यासाठी त्यांच्यात झटापटही होते. तरीही हे दोघंही चिमुकले हसत राहतात. याचा हसण्याचं कारण काय हे मात्र अद्याप कुणाला कळलं नसलं तरी त्यांचं हसू पाहून आपल्या चेहऱ्यावर हसू आल्याशिवाय राहात नाही.
— Nicola Maria Roberts (@NicolaRoberts) May 14, 2020
हा व्हिडीओ गायक आणि गीतकार निकोल मारिया रॉबर्ट यांनी ट्वीट केला आहे. व्हिडीओ आतापर्यंत 3.2 मिलियन लोकांनी पाहिला असून 2 हजार लोकांनी रिट्वीट केला आहे. तर 330 युझर्सनी यावर कमेंट्स केल्या आहेत. या लहान मुलांचं हे खळखळून हसणं पाहून आपला चेहऱ्यावरचा ताण हलका होतो.
I think they're drunk on Lucozade 😂😂😂
— Stay Safe, Stay Home 🏠 (@DeanTweets_) May 14, 2020
I want to do it now 😁
— Pearse Kevin McMullen (@manwithtwopints) May 14, 2020
kids are mini drunk adults - try to convince me otherwise
एका युझरनं म्हटलं आहे की या मुलांना ड्रिंक दिली असण्याची शक्यता आहे. यामुळे ते न थांबता इतके हसत आहेत. तर आणखी एका युजरनं म्हटलं की मलाही असं हसायचं आहे.
सोशल मीडियावर या दोन चिमुकल्यांचा व्हिडीओनं धुमाकूळ घातला आहे. त्यांचं हसणं पाहून युजर्सनाही हसू आवरलं नाही तर काही युजर्सनी हा वेडेपणा असल्याचंही म्हटलं आहे. सोशल मीडियावर चिमुकल्यांच्या हसण्याचं मात्र तुफान कौतुक केलं जात आहे.