Home /News /viral /

VIDEO : नदीच्या पूरामध्ये थरार, स्वत:ची पर्वा न करता वाचवला दोघांचा जीव

VIDEO : नदीच्या पूरामध्ये थरार, स्वत:ची पर्वा न करता वाचवला दोघांचा जीव

नदीचं पाणी इतकं वेगानं वाहत होतं की त्याची थोडीही चूक ही जीवघेणी ठरली असती. त्यानंतरही त्यानं अतिशय धैर्य दाखवत त्यांना वाचवलं आहे.

    मुंबई, 3 जुलै : या जगातील माणुसकी संपली आहे, असं अनेक नकारात्मक मंडळींचं मत आहे. एकमेकांना त्रास देणारी, दुसऱ्यांचे पाय ओढणारी मंडळीच या जगात आहेत असं त्यांचं मत आहे. पण, प्रत्यक्षात सगळीकडंच तसं चित्र नाही. माणुसकीच्या नात्यानं एकमेकांना मदत करणारी मंडळी आजही जगात आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल  (Man saved kids from flood viral video) होत आहे. त्यामध्ये एका व्यक्तीनं माणुसकीचा धर्म पाळला आहे. @MorissaSchwartz या ट्विटर अकाऊंटवरून अनेक अद्भुत असे व्हिडीओ शेअर केले जातात.  या अकाऊंटवरून एक व्हिडीओ नुकताच शेअर करण्यात आलाय. त्यामध्ये एका व्यक्तीनं दोन मुलांना (two kids focus in flood viral video) वाचवलंय. त्यानं पूर आलेल्या नदीमध्ये त्यांना वाचवण्यासाठी उडी मारली. नदीचं पाणी इतकं वेगानं वाहत होतं की त्याची थोडीही चूक ही जीवघेणी ठरली असती. त्यानंतरही त्यानं अतिशय धैर्य दाखवत त्यांना वाचवलं आहे. नदीचं पाणी इतकं वेगानं वाहत आहे की ते आता मार्गातील सारं काही उद्धवस्त करेल असं कुणालाही वाटू शकतं. याच पाण्यात दोन तरूण अडकले होते. ते देखील त्या पाण्याबरोबर वाहू लागतात. त्याचवेळी एका व्यक्ती त्या पाण्यात उतरली. त्यानं त्या मुलांना हातानं पकडून अगदी सावकाश किनाऱ्यावर आणले. हा व्हिडीओ पश्चिम आशियातील आहे, असं सांगण्यात येत असलं तरी त्याची अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. जगातील सर्वात वयोवृद्ध एअरहोस्टेसची गिनिज बुकमध्ये नोंद, या वयातही करतेय नोकरी हा व्हायरल व्हिडीओ 9 लाखांपेक्षा जास्त जणांनी पाहिला असून त्याला 43 हजार लाईरक्स मिळाले आहेत.  ज्या व्यक्तीनं त्याला वाचवलं तो मरीन ऑफिसर असल्याचा दावा एका व्यक्तीनं कमेंटमध्ये केलाय. तसंच ही ओमानची घटना असल्याचं त्यानं सांगितलं आहे, पण या दाव्याला अद्याप अधिकृत पातळीवर कोणताही दुजोरा मिळालेला नाही.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: Viral video on social media, Viral video.

    पुढील बातम्या