Home /News /viral /

2 तोंडं असलेल्या सापाने एकसोबतच गिळले दोन उंदीर; VIDEO पाहून येईल अंगावर काटा

2 तोंडं असलेल्या सापाने एकसोबतच गिळले दोन उंदीर; VIDEO पाहून येईल अंगावर काटा

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसतं, की हा साप एका टायरच्या मध्ये बसलेला आहे आणि यातच दोन उंदराची पिल्लेही दिसत आहेत.

  नवी दिल्ली 08 डिसेंबर : तुम्ही सोशल मीडियावर (Social Media) सक्रीय असाल तर इथे दररोज तुम्हाला नवनवे व्हिडिओ पाहायला मिळत असतील. यातील अनेक व्हिडिओ हसवणारे असतात तर काही हैराण करणारे. मात्र, सध्या एक अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल. साप हा एक असा जीव आहे ज्याचं नाव ऐकूनच आपल्याला धडकी भरते. मात्र सध्या सापाचा असा व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहूनच तुमच्या अंगावर काटा येईल (Horrifying Video of Snake). हेही वाचा - नवऱ्याचं बायकोवरील प्रेम इतकं उतू गेलं की सर्वांसमोर नको तेच घडलं; पाहा VIDEO आजपर्यंत तुम्ही अनेक लहान-मोठे साप पाहिले असतील. मात्र तुम्ही कधी दोन तोंडं असलेला साप पाहिला आहे का? जर तुम्ही असा साप पाहिलेला नसेल तर आता असाच सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. हा व्हिडिओ अतिशय भयंकर आहे कारण हा दोन तोंडं असलेल्या सापाचा आहे. यात दोन तोंडं असलेला साप एकसोबतच दोन उंदरांना गिळताना दिसतो (Two-Headed Snake Swallowing two Mice) . व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसतं, की हा साप एका टायरच्या मध्ये बसलेला आहे आणि यातच दोन उंदराची पिल्लेही दिसत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे सापाने आपल्या एका तोंडाने एका उंदराला पकडून ठेवलं आहे तर दुसऱ्या तोंडात दुसऱ्या पिल्लाला पकडलं आहे.
  हा व्हिडिओ snake._.world नावाच्या अकाऊंटवरुन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला गेला आहे. आतापर्यंत व्हिडिओला 10 हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया यूजर्सही हैराण झाले आहेत आणि यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत. हेही वाचा - भूत बंगल्यात जाताच मुलासोबत घडली विचित्र घटना; मृतदेह पाहून डॉक्टरही शॉक सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओवर यूजर्स संमिश्र प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका यूजरने सवाल केला की यांचं पोटही एक नाहीये का? तर अनेकांनी हा व्हिडिओ हृदय पिळवटून टाकणारा असल्याचं म्हटलं आहे. एका यूजरने व्हिडिओवर कमेंट करत म्हटलं, हा व्हिडिओ सामान्य नाही. तो सेन्सेटिव्ह कॅटेगिरीमध्ये ठेवून शेअऱ करायला हवा.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Shocking video viral, Snake video

  पुढील बातम्या