मराठी बातम्या /बातम्या /Viral /

नेते येण्याआधीच भाजप कार्यकर्त्यांनी गाजवली सभा, व्यासपीठावरच तुफान हाणामारी LIVE VIDEO

नेते येण्याआधीच भाजप कार्यकर्त्यांनी गाजवली सभा, व्यासपीठावरच तुफान हाणामारी LIVE VIDEO

व्यासपीठावर दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आणि काही क्षणात याचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर एकच धुमश्चक्री उडाली.

  • Published by:  sachin Salve
दुर्गापूर, 21 डिसेंबर : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (west bengal election 2021) तोंडावर भाजप (BJP) आणि तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) चांगलाच वाद पेटला आहे. अनेक ठिकाणी भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा पाहण्यास मिळत आहे. पण, आता भाजपच्या कार्यकर्त्यांची भर व्यासपीठावर तुफान हाणमारी झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. पश्चिम बंगालच्या दुर्गापूरमध्ये भाजपकडून सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. सभेचं भव्य असं व्यासपीठ उभारण्यात आले होते. भाजपचे नेते दिलीप घोष आणि अर्जुन सिंग हे सभेत हजर होण्यासाठी रवाना झाले होते. पण दोन्ही नेते येण्याआधीच व्यासपीठावरच भाजपच्या कार्यकर्त्यांच्या दोन गटांमध्ये जुंपली. व्यासपीठावर दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आणि काही क्षणात याचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर एकच धुमश्चक्री उडाली. दोन्ही गटातील तरुणांनी एकमेकांना लाथा बुक्याने मारहाण केली. प्रॉपर्टी डिलरची भर रस्त्यात गोळ्या झाडून हत्या, पाहा धक्कादायक VIDEO व्यासपीठावर सुरू असलेला हा राडा नंतर मोकळ्या मैदानात आला. त्यानंतर दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी पाहण्यास मिळाली. कार्यकर्ते भिडल्याचे पाहून अखेर पदाधिकारी धावून आले आणि मध्यस्थी करत दोन्ही गटांना सोडवले. या घटनेमुळे सभेत एकच गोंधळ उडाला होता. अखेर दोन्ही नेते सभेत ठिकाणी दाखल झाल्यानंतर पुढील  कार्यक्रम सुरळीत पार पडला. पण, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
First published:

पुढील बातम्या