मराठी बातम्या /बातम्या /Viral /

कॅन्सरच्या उपचारानंतर झाली दोन चिमुकल्या जिगरी दोस्तांची पहिली भेट; VIDEO पाहून पाणावतील डोळे

कॅन्सरच्या उपचारानंतर झाली दोन चिमुकल्या जिगरी दोस्तांची पहिली भेट; VIDEO पाहून पाणावतील डोळे

मॅक आणि पेसन या दोघांनीही एकसोबतच कॅन्सरसोबतची लढाई लढली. यानंतर झालेली त्यांची पहिली भेट पाहून कोणाचेही डोळे पाणावतील.

मॅक आणि पेसन या दोघांनीही एकसोबतच कॅन्सरसोबतची लढाई लढली. यानंतर झालेली त्यांची पहिली भेट पाहून कोणाचेही डोळे पाणावतील.

मॅक आणि पेसन या दोघांनीही एकसोबतच कॅन्सरसोबतची लढाई लढली. यानंतर झालेली त्यांची पहिली भेट पाहून कोणाचेही डोळे पाणावतील.

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 18 ऑगस्ट : कॅन्सर (Cancer) हा एक असा आजार आहे, जो लोकांचं आयुष्य नरक बनवतो. हा भयंकर आजार केवळ रुग्णालाच (Cancer Patient) नाही तर त्याच्या संपूर्ण कुटुंबालाच मोठ्या संकटांमध्ये खेचतो. कॅन्सरमधून बरं झाल्यानंतर एका ३ वर्षीय मुलाची एकमेव इच्छा पेसनला भेटण्याची होती. मॅक आणि पेसन या दोघांनीही एकसोबतच कॅन्सरसोबतची लढाई लढली. यानंतर झालेली त्यांची पहिली भेट पाहून कोणाचेही डोळे पाणावतील. या चिमुकल्यांचा व्हिडिओ (Emotional Video Viral) पाहून कोणालाही नवी आशा मिळेल. लस घेताच ढसाढसा रडू लागला; रडक्या तरुणाला पाहून नर्सही हैराण, पाहा VIDEO सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल (Viral on Social Media) होत आहे. हा व्हिडिओ अशा लोकांना ताकत देणारा आहे, जे आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण परिस्थितीतून जात आहेत. एका वृत्तानुसार, पेसन एल्टिस आणि मॅक पोर्टर यांची भेट याचवर्षी आपल्या कॅन्सरवरील उपचारादरम्यान रुग्णालयात झाली होती. अनेक आठवडे एकमेकांपासून दूर राहिल्यानंतर ते पुन्हा एकदा रुग्णालयाच्या बाहेर भेटले आणि त्यांच्या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा इमोशनल व्हिडिओ मॅकी स्ट्रॉन्ग नावाच्या एका पेजवरुन इन्स्टाग्रामवर शेअर केला गेला आहे.
View this post on Instagram

A post shared by Macky! (@macky.strong)

VIDEO- यांच्यापेक्षा जनावरं बरी! प्राणीसंग्रहालयात एकमेकांच्या जीवावर उठली माणसं पेसन आणि मॅक फॉरएव्हर असं कॅप्शन देत हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. यात मॅक हातामध्ये फुलांचा गुच्छ घेऊ हळूहळू पॅसनकडे जाताना दिसतो. पॅसनही आनंदानं आपल्या मित्राच्या हातातील फुलं घेते आणि यानंतर दोघंही गळाभेट घेतात. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की यानंतर दोघंही डान्स करू लागतात. इन्स्टाग्रामवर या व्हिडिओला भरपूर लाईक मिळत आहे. सोबतच अनेकांनी कमेंट करत या दोघांचंही कौतुक केलं आहे.
First published:

Tags: Cancer, Emotional, Video viral

पुढील बातम्या