Home /News /viral /

घर दुरुस्तीच्या कामासाठी येणाऱ्या गवंड्यांवर जडलं प्रेम; घरातून फरार झाल्या दोन्ही सूना, अजब Love Story

घर दुरुस्तीच्या कामासाठी येणाऱ्या गवंड्यांवर जडलं प्रेम; घरातून फरार झाल्या दोन्ही सूना, अजब Love Story

Weird Love Story: दोन गवंडी एकाच घरात दुरुस्तीच्या कामासाठी आले होते आणि तिथे दोन महिलांसोबत त्यांची मैत्री झाली. नंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं

  नवी दिल्ली 23 डिसेंबर : प्रेमात जात-धर्म, रंग-रूप किंवा वय पाहिलं जात नाही असं अनेकदा आपण ऐकलं असेल. मात्र अनेकदा प्रेमात लोक असं काही करतात की इतरांना थेट कोर्टाची पायरी चढावी लागते. पश्चिम बंगालच्या हावडा येथून प्रेमाचं एक असंच अजब प्रकरण (Weird Love Story) समोर आलं आहे. यात दोन गवंडी एकाच घरात दुरुस्तीच्या कामासाठी आले होते आणि तिथे दोन महिलांसोबत त्यांची मैत्री झाली. नंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. यानंतर दोन्ही महिला दोघा गवंड्यांसह पळून गेल्या (2 Women Ran Away With Mason). यानंतर घरातील लोकांनी पोलिसांत तक्रार नोंदवली, तेव्हा हळूहळू संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. '2 वेळा टळलं लग्न आणि आता...'; तरुणीनं थेट पंतप्रधानांना पत्र लिहित केली तक्रार लोकल मीडिया रिपोर्टनुसार, हाडवडाच्या निश्चिंदा ठाण्याच्या क्षेत्रात दोन गवंडी एका घरात दुरुस्तीच्या कामासाठी गेले. घरात असलेल्या दोन महिलांसोबत दोघांचं बोलणं सुरू झालं. हळूहळू दोघींचंही या गवंड्यांवर प्रेम जडलं. यानंतर गवंडी या महिलांना आपल्या घरी मुर्शिदाबाद येथे घेऊन गेले आणि यानंतर एका दिवसाने घर सोडून मुंबईला निघाले. यानंतर तक्रारदार ठाण्यात पोहोचले तेव्हा पोलिसांनी केस दाखल करण्यासाठी प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातील मोठ्या सुनेची कॉल लिस्ट तपासली गेली. यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला. पोलीस गवंड्यांच्या घरीही पोहोचले. मात्र तोपर्यंत दोघंही महिलांना घेऊन फरार झाले होते.

  Shocking! रात्री लैंगिक संबंध, दुसऱ्या दिवशीच सकाळी 'प्रेग्नंट' व्हायची महिला

  स्थानिक पोलीस गवंड्यांसोबत फरार झालेल्या या महिलांचं लोकेशन शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस एक स्पेशल टीम बनवून मुंबईला पाठवण्याच्या तयारीत आहेत. घरातील मोठ्या सुनेसोबतच लहान सूनही आपल्या सहा वर्षाच्या मुलासोबत फरार झाली आहे. घरातून बाहेर पडताच दोघींनीही आपला मोबाईल फोन बंद केला. यानंतर आता पोलीस त्यांचं शेवटचं लोकेशन शोधून प्रकरणाचा तपास करण्याचा प्रयत्न करत आहेत. मुंबईत वेगवेगळ्या सुत्रांच्या माध्यमातून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Love story, Viral news

  पुढील बातम्या