मराठी बातम्या /बातम्या /Viral /

CCTV Footage : बस अपघाताचा थरारक व्हिडीओ; दोन बसची समोरासमोर धडक, 30 जण जखमी

CCTV Footage : बस अपघाताचा थरारक व्हिडीओ; दोन बसची समोरासमोर धडक, 30 जण जखमी

फोटो क्रेडिड - एएनआय

फोटो क्रेडिड - एएनआय

तामिळनाडू राज्याच्या सलेम (Salem Tamilnadu) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एडप्पादीहून तीस प्रवासी घेऊन निघालेल्या एका खासगी बसची तिरुचेनगोडेकडून येणाऱ्या दुसऱ्या खासगी बसला धडक दिली. (Bus Accident in Tamilnadu) या दोन बसच्या धडकेत 30 जण जखमी झाले.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

चेन्नई, 18 मे : तामिळनाडू राज्याच्या सलेम (Salem Tamilnadu) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एडप्पादीहून तीस प्रवासी घेऊन निघालेल्या एका खासगी बसची तिरुचेनगोडेकडून येणाऱ्या दुसऱ्या खासगी बसला धडक दिली. (Bus Accident in Tamilnadu) या दोन बसच्या धडकेत 30 जण जखमी झाले. ही अपघाताची घटना सीसीटीव्हीत (Accidennt CCTV Video) कैद झाली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Accident Video Viral on Social Media) होत आहे. हा व्हिडीओ अत्यंत भयानक असा आहे. अपघाताची ही घटना काल 17 मे रोजी, मंगळवारी घडली.

एकूण 30 जण जखमी -

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, कशाप्रकारे अगदी सेकंदात धडक दिल्यानंतर बसचालक आपल्या सीटवरुन फेकला गेला. तसेच बसचे कशाप्रकारे नुकसाने झाले आहे. या अपघातात एकूण 30 प्रवाशी जखमी झाले आहेत. यानतंर त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा - Dhule Accident: मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; तिहेरी अपघातात रिक्षा आणि क्रूझरचा चक्काचूर, तिघांचा मृत्यू

चुकीच्या लेनमध्ये येऊन धडकली बस - 

मिळालेल्या माहिनुसार, बस समोरून चुकीच्या लेनमध्ये आल्याने दुसऱ्या बसला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की बसमधील अनेक जण विंडस्क्रीनवर पडले. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये बस चालक आपल्या लेनमध्ये आरामात गाडी चालवत असल्याचे दिसत आहे. मात्र, समोरून एक बस चुकीच्या लेनमध्ये येऊन जोरदार धडकते आहे. यादरम्यान बसचा वाहक, चालक आणि अन्य एक प्रवासी बसच्या काचेला धडकले. यानंतर काच तुटला. तसेच काही प्रमाणात हा काच चालकाच्या डोक्यातही घुसला.

First published:

Tags: Accident, Road accident, Tamilnadu