मुंबई, 23 नोव्हेंबर : बऱ्याचवेळा प्राण्यांचं लक्ष नसेल आणि त्यांना आपण हलवलं किंवा कसली चाहूल लागली की ते स्वत:चं घाबरून पळून जातात यामध्ये वाघ आणि बिबट्यादेखील मागे नाहीत. कायम बिबट्या आणि वाघाचे शिकारीचे किंवा थरारक व्हिडीओ पाहिले असतील पण बिबट्याला कधी घाबरलेलं पाहिलं आहे का?
सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये बिबट्या घाबरून पाणी सोडून पळत सुटतो. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की बिबट्या पाणी पित असताना अचानक मागून दुसरा बिबट्या दबक्या पावलांनी येतो. पहिल्या बिबट्याला कोणीतरी आलं याची चाहूल लागते आणि तो घाबरून पळत सुटतं. जसा काही बिबट्याचाच जीव घ्यायला कोणी आलं आहे असं त्याला वाटतं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
IFS अधिकारी प्रवीण कासवान यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 74 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. 400 हून अधिक लोकांनी रिट्वीट केला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की दोन्ही बिबट्या रात्रीच्या अंधारात एकमेकांना पाहून घाबरले आणि दोघांनी आपला जीव वाचवत धूम ठोकली आहे. हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर युझर्सनी खूप लाइक केला आहे.