मराठी बातम्या /बातम्या /Viral /

लग्नासाठी दारोदार भटकत होता अडीच फूट उंचीचा अझिम; अखेर नवरी मिळाली नवऱ्याला!

लग्नासाठी दारोदार भटकत होता अडीच फूट उंचीचा अझिम; अखेर नवरी मिळाली नवऱ्याला!

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) यानं देखील फोन करुन त्याची विचारपूस केल्याची बातमी समोर आली होती.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) यानं देखील फोन करुन त्याची विचारपूस केल्याची बातमी समोर आली होती.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) यानं देखील फोन करुन त्याची विचारपूस केल्याची बातमी समोर आली होती.

    लखनऊ, 19 मार्च : गेल्या काही काळापासून उत्तर प्रदेशात राहणाऱ्या अडीच फूट उंचीच्या अझिम मन्सूरी हा 26 वर्षांचा तरुण बराच चर्चेत आहे. तो स्वत:साठी नवरी शोधत असल्याने त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अडीच फुटाच्या या अझिमचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी खूप व्हायरल झाला होता. 'माझं लग्न लावून द्या', असं सांगत तो अगदी पोलीस ठाण्यापर्यंतदेखील पोहोचला होता. मात्र असं दिसतंय की आता त्याची इच्छा पूर्ण होणार आहे. अझिम मन्सूरीला अखेर नवरी भेटली आहे. मात्र दोघांचं लग्न ठरलं की नाही याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. तर जाणून घेऊया कोण आहे ती मुलगी? (Two and a half feet Azim Mansoori finally got a bride) उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात राहणारा अझिम मन्सूरीसाठी गाजियाबादच्या साहिबाबाद येथून मुलगी सांगून आली आहे. सांगितलं जात आहे की, मुलीचीही उंची कमी आहे. रिपोर्टनुसार मुलीचं नाव रेहना असून ती 25 वर्षांची आहे. रेहानाचे वडील इकबाल यांनी सांगितलं की, त्यांनी अझिमचा व्हिडिओ पाहिला, ज्यात तो लग्नासाठी मुलगी शोधून देण्याची मागणी करीत आहे. ते म्हणाले की, बऱ्याच काळापासून ते रेहानासाठी मुलगा पाहत आहेत. मात्र तिची उंची कमी आहे. ज्यामुळे तिचं लग्न ठरण्यासाठी अडचणी येत आहेत. मात्र त्यांना आशा आहे की, रेहानाचं लग्न अझिमसोबत होईल. हे ही वाचा-तू फक्त मुंबईत ये… सलमान खान करुन देणार 2 फुटांच्या तरुणाचं लग्न अझिमच्या कुटुंबाकडे केली लग्नाची मागणी मिळालेल्या माहितीनुसार रेहानाच्या कुटुंबीयांनी अझिमकडे लग्नाची मागणी केली आहे. आता अझिमच्या कुटुंबाकडून उत्तराची प्रतीक्षा आहे. अझिमचे कुटुंबीय या नात्याकडे सकारात्मकपणे पाहत असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या दोन्ही कुटुंबांमध्ये चर्चा सुरू आहे. आता अजीमचं लग्न कधी ठरणार यासाठी लोक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. अझिम अन्सारीने व्हिडिओ जारी करीत लग्नाची मागणी केली होती. सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Marriage, Viral

    पुढील बातम्या