कमाल! 'Baba Ka Dhaba'वर खवय्यांची गर्दी, रडणाऱ्या दाम्पत्याच्या चेहऱ्यावर आलं हसू; पाहा VIDEO

कमाल! 'Baba Ka Dhaba'वर खवय्यांची गर्दी, रडणाऱ्या दाम्पत्याच्या चेहऱ्यावर आलं हसू; पाहा VIDEO

नेटकऱ्यांची कमाल पाहा. VIDEO व्हायरल झाल्यानंतर अवघ्या काही तासांत लोकांनी केली 80 वर्षी दाम्पत्याला मदत.

  • Share this:

नवी दिल्ली, 08 ऑक्टोबर : सोशल मीडिया शाप की वरदान, यावर सतत चर्चा होत असतात. काहीवेळा सोशल मीडियावर एखादी गोष्ट व्हायरल झाली की त्याचे परिणाम भीषण होतात. मात्र सोशल मीडियाच एखाद्या देशाचं सरकारही पाडू शकते. याच सोशल मीडियावरील नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे.

सोशल मीडियावर एका 80 वर्षीय दाम्पत्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. कोरोनामुळे परिस्थिती बिकट झाल्यानंतर त्यांनी दिल्लीतील मालविया नगर जवळ बाबा का ढाबा नावाचा ढाबा सुरू केला. मात्र कोरोनामुळे ग्राहक येत नव्हते. या 80 वर्षीय बाबांचा रडतानाचा आणि लोकांना विनंती करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. एका दिवसात #BabaKaDhaba ट्रेंड होऊ लागलं, आणि आज सकाळपासून या ढाब्यावर लोकांनी तुफान गर्दी केली.

या गर्दीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनाही विश्वास बसला नाही. 80 वर्षीय जोडप्याला मदत करण्यासाठी लोकांनी ढाब्यावर गर्दी केली.

ज्या लोकांना ढाब्यावर जाणं शक्य नव्हतं त्यांनी गुगल पेच्या माध्यमातून या दाम्पत्याला मदतीचा हात दिला. अवघ्या काही तासांत मिळालेल्या या प्रतिक्रियेनंतर अश्रू असलेल्या त्या दाम्पत्याचे डोळे आनंदाने पाणावले.

या 80 वर्षीय बाबांनी लोकांचे आभार मानत, ज्यांना दोन वेळचं अन्न मिळत नाही, त्यांनी ढाब्यावर यावे त्यांची मी सोय करते, असे म्हणाले.

एवढेच नाही तर बॉलिवूडपासून क्रिकेटपटूपर्यंत सर्वच जण या बाबांना मदत करण्यासाठी पुढे आले आहे. अभिनेत्री सोनम कपूर, रवीन टंडन यांच्यासह क्रिकेटपटू आर अश्विननं या बाबांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. तक झोमॅटो ऑनलाइन या फूड डिलिव्हरी अॅपने सुद्धा यांना मदत करणार असल्याचे सांगितले.

Published by: Priyanka Gawde
First published: October 8, 2020, 1:15 PM IST

ताज्या बातम्या