झुरळाचा 'सिगारेट ओढतानाचा' Video झाला Viral, ट्विटरवर लोकांनी दिले भन्नाट कमेन्ट

झुरळाचा 'सिगारेट ओढतानाचा' Video झाला Viral, ट्विटरवर लोकांनी दिले भन्नाट कमेन्ट

सध्या सोशल मीडियावर एक विचित्र व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला सुरुवातीला त्यावर विश्वास बसणार नाही.

  • Share this:

सध्या सोशल मीडियावर एक विचित्र व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला सुरुवातीला त्यावर विश्वास बसणार नाही. एक झुरळ चक्क सिगरेट ओढताना दिसत आहे. ट्विटरवर सध्या हाच व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ट्विटरकरांनी या व्हिडीओवर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या असून काहींनी याची थट्टाही उडवली. 18 ऑक्टोबरला टॉम क्रेचमरने ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला. यात झुरळाने एक मोठी सिगारेट पकडली आहे. सीएनएनने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, न्यूयॉर्कमधील एका गल्लीतील हा व्हिडीओ आहे.

सोशल मीडियावर झुरळाचा हा व्हिडीओ चर्चेचा विषय झाला आहे. आतापर्यंत सुमारे 3.6 दशलक्ष लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून 95 हजाराहून जास्त लोकांनी लाइक केला आहे, तर 21 हजारांहून अधिक लोकांनी कमेन्ट केल्या आहेत. ट्विटरवर काही लोक झुरळाचं कौतुक करताना दिसत आहेत तर काहींनी व्हिडीओची थट्टा उडवली. एका युझरने लिहिले की, 'झुरळ सध्या ब्रेकवर आहे. कोणी त्याला त्रास देऊ नका.' तर दुसऱ्या युझरने लिहिले की, 'आजचा दिवस झुरळासाठी कठीण गेला असेल. यामुळे तो सिगारेट ओढत असेल.'

या औषधामुळे होऊ शकतो कॅन्सर, तुम्ही तर घेत नाहीत ना...

Dhanteras 2019: धनत्रयोदशीला हमखास विकत घ्या या 5 गोष्टी, होईल भरभराट

Diwali 2019: धनत्रयोदशीला चुकूनही या गोष्टी विकत घेऊ नका, नाहीतर...

या सोप्या टिप्सने तुम्हीही बोलू शकता अस्खलित इंग्रजी!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 21, 2019 04:47 PM IST

ताज्या बातम्या