मराठी बातम्या /बातम्या /Viral /

16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण: वडापाव, तर्रीपोहे ते मोमोज Twitter यूजर्सनी काय भन्नाट आयडियाच्या कल्पना दिल्यात पाहा

16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण: वडापाव, तर्रीपोहे ते मोमोज Twitter यूजर्सनी काय भन्नाट आयडियाच्या कल्पना दिल्यात पाहा

भारतीय नागरिकांना उद्यापासून (16 जानेवारी) कोरोना लस (Corona vaccine) मिळणार आहे. परंतु इतक्या गंभीर आजारावरसुद्धा आहेत त्या परिस्थितीत देखील जोक आणि मिम्स (Memes) शेअर करणार नाहीत ते भारतीय कसले?

भारतीय नागरिकांना उद्यापासून (16 जानेवारी) कोरोना लस (Corona vaccine) मिळणार आहे. परंतु इतक्या गंभीर आजारावरसुद्धा आहेत त्या परिस्थितीत देखील जोक आणि मिम्स (Memes) शेअर करणार नाहीत ते भारतीय कसले?

भारतीय नागरिकांना उद्यापासून (16 जानेवारी) कोरोना लस (Corona vaccine) मिळणार आहे. परंतु इतक्या गंभीर आजारावरसुद्धा आहेत त्या परिस्थितीत देखील जोक आणि मिम्स (Memes) शेअर करणार नाहीत ते भारतीय कसले?

मुंबई, 15 जानेवारी : भारतात कोरोना लसीकरणाची (Corona vaccination) तयारी सुरू आहे. 16 जानेवारीला लसीकरण (covid 19 vaccination) सुरू केलं जाणार आहे. केंद्र सरकारने यासाठी लस खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं लस उत्पादक कंपन्यांशी करार करून लशीचे (Vaccine) डोसही खरेदी केले आहेत. जगभरातील सर्वात मोठी  मोहीम भारतात राबवली जाणार असून यामध्ये पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी(Health Workers) आणि 50 वर्षांपुढील नागरिकांना लस दिली जाणार आहे.

यामध्ये 3 कोटी आरोग्य कर्मचारी असून जवळपास 27 कोटी इतकी 50 वर्षांवरील नागरिकांची संख्या आहे. यामुळे लवकरच भारतीय नागरिकांना लस मिळणार आहे. परंतु इतक्या गंभीर परिस्थितीत देखील जोक आणि मिम्स (Memes) बनवणार नाहीत ते भारतीय कसले? लसीकरणाची घोषणा झाल्यानंतर ट्विटर (Twitter) आणि सोशल मीडियावर या लसीकरणासंबंधी विविध मिम्स(Memes) व्हायरल होत असून यामध्ये विविध पदार्थांच्या माध्यमातून हे लसीकरण करण्याचे ट्विट अनेकजण करत आहेत. यामध्ये काहीजणांनी वडापावमध्ये लस टाकून ती सर्व मुंबईकरांना द्यावी असे म्हटले आहे तर एकाने मोमोमध्ये लस टाकून ती दिल्लीकरांना देण्याचे ट्विट केले आहे.

हे ही वाचा- VIDEO Clips बाबत रेणू शर्माच्या वकिलाचा धक्कादायक खुलासा; धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार? 

एकाने तर्री पोह्यामध्ये ही लस टाकून सर्व नागपूरकरांना देण्याचे ट्विट केले आहे. तर एकाने राजमा चावलमध्ये ही लस टाकून संपूर्ण उत्तर भारताला देण्याचे म्हटले आहे. एकाने नातेवाईकांच्या नाकामध्ये ही लस टाकण्याचे म्हटले आहे. नातेवाईक आपले नाक सगळीकडे घालत असल्याचे मजेशीर ट्विट करत त्याने लस नातेवाईकांच्या नाकात सोडण्याचे म्हटले आहे. तर एकाने ही लस पानमसाल्यात टाकून संपूर्ण कानपूरला देण्याचे म्हटले आहे. याचबरोबर लिट्टी चोखामध्ये टाकून ही लस संपूर्ण बिहारला देण्याचे म्हटले आहे.

हे ही वाचा-राजकीय प्रेमप्रकरणं आणि बरचं काही; धनंजय मुंडेंप्रमाणे कोणते नेते होते चर्चेत?

गुजरातमध्ये लसीकरण करण्यासाठी उंदियोमध्ये आणि चिक्कीमध्ये लस टाकण्याचे ट्विट एकाने केलं आहे. याचबरोबर एकाने पंजाबमधील दारूमध्ये लस टाकण्याचे ट्विट केले आहे.  रात्री लस टाकली तर सकाळपर्यंत संपूर्ण पंजाबमध्ये लसीकरण होईल असे त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. याचबरोबर एकाने मेडिकल स्टुडंटना लस देण्यासाठी ती मॅगी, चहा आणि कॉफीमध्ये टाकण्याचे म्हटले आहे.

put the vaccine in tarri poha and all of nagpur will get vaccinated in a day

— big PP (@uwuxeshaan) January 14, 2021

दरम्यान, केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने लसीकरणाची संपूर्ण तयारी केली आहे. 2 ते 8 जानेवारीदरम्यान यासाठी ड्राय रन(Dry Run) देखील केले आहे. याचबरोबणार को-विन (CoWin) ॲपच्या माध्यमातून सरकारने नोंदणी देखील सुरु केली आहे. यामधून सरकारकडे नागरिकांचा डेटा गोळा होणार असून लसीकरणामध्ये आणि लसीकरणानंतर देखील याचा मोठा फायदा होणार आहे. लसीकरण झालेल्या नागरिकांवर या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे.

First published:

Tags: Corona vaccine