मराठी बातम्या /बातम्या /Viral /10 व्या मजल्यावरुन पडल्यानं जुळ्या बाळांचा मृत्यू; पोलीस घरी पोहोचले तेव्हा आई FB Live मध्ये होती मग्न

10 व्या मजल्यावरुन पडल्यानं जुळ्या बाळांचा मृत्यू; पोलीस घरी पोहोचले तेव्हा आई FB Live मध्ये होती मग्न

ही महिला आपल्याच नादात इतकी मग्न होती की तिला मुलं ओरडल्याचा आवाजही ऐकू आला नाही. तिला या गोष्टीची माहिती तेव्हा झाली जेव्हा पोलीस घरी पोहोचले.

ही महिला आपल्याच नादात इतकी मग्न होती की तिला मुलं ओरडल्याचा आवाजही ऐकू आला नाही. तिला या गोष्टीची माहिती तेव्हा झाली जेव्हा पोलीस घरी पोहोचले.

ही महिला आपल्याच नादात इतकी मग्न होती की तिला मुलं ओरडल्याचा आवाजही ऐकू आला नाही. तिला या गोष्टीची माहिती तेव्हा झाली जेव्हा पोलीस घरी पोहोचले.

नवी दिल्ली 14 सप्टेंबर : सोशल मीडियाचा (Social Media) अतिवापर अनेकदा लोकांचं आयुष्यच उद्धवस्त करून टाकतो. याचं प्रत्यय देणारी एक घटना नुकतीच रोमानिया (Romania) येथून समोर आली आहे. या घटेनत फेसबुकवर (Facebook) व्यस्त असलेल्या महिलेच्या मुलांसोबत अत्यंत दुर्देवी घटना घडली मात्र तिला या गोष्टीची भनकही लागली नाही (Twins Dies After Falling Down From 10th Floor).

रोमानिया येथील ही महिला जेव्हा फेसबुकवर Live Streaming करण्यात व्यग्र होती तेव्हा तिची जुळी मुलं दुसऱ्या खोलीत खेळत होती. आई सोशल मीडियावर लोकांसोबत बोलत राहिली आणि 2 वर्षाची तिची ही जुळी मुलं दहाव्या मजल्यावरुन खाली कोसळली. हैराण करणारी बाब म्हणजे, महिलेला या घटनेची भनकही लागली नाही.

मुलीच्या मैत्रिणीवर जडलं बापाचं प्रेम; भडकलेल्या लेकीनं उचललं मोठं पाऊल

The Sun मध्ये आलेल्या वृत्तानुसार, ही दुर्देवी घटना रोमानियाच्या प्लॉइस्टी शहरात घडली. या घटनेत 2 वर्षाच्या जुळ्या मुलांची आई अँड्रिया वायलेट पेट्रीस घरातूनच Live Streaming करण्यात व्यग्र होती. याचदरम्यान तिची जुळी मुलं मोइस क्रिस्टियन पेट्रीस आणि बीट्राइस-एरिका पेट्रीस खेळताना दहाव्या मजल्याहून खाली कोसळले. मात्र, ही महिला आपल्याच नादात इतकी मग्न होती की तिला मुलं ओरडल्याचा आवाजही ऐकू आला नाही. तिला या गोष्टीची माहिती तेव्हा झाली जेव्हा पोलीस घरी पोहोचले.

मांजरीसाठी थांबवला फुटबॉलचा LIVE सामना; वाचवले मुक्या जीवाचे प्राण, पाहा VIDEO

पोलीस जेव्हा घरी आले तेव्हा ही महिला लाईव्ह चॅटमध्ये व्यग्र होती. पोलीस अधिकाऱ्यांनी हे लाईव्ह चॅट बंद करत तिला तिच्या मुलांच्या मृत्यूची माहिती दिली. परंतु हे सगळं ऐकल्यानंतर महिलेनं तिनं आपण निर्दोष असल्याचं म्हटलं आणि सांगितलं, की तिची एक मैत्रीण या बाळांवर लक्ष ठेवत होती मात्र त्यावेळी ती मोठ्या मुलासोबत दुसऱ्या खोलीत झोपली होती. तिनं हेदेखील सांगितलं, की मुलं खिडकीवर चढूच शकत नाहीत. मात्र, शेजाऱ्यांनीही सांगितलं की ही बाळं खिडकीवर चढली होती. महिलेच्या मैत्रिणीनंही आपल्यावरील आरोप खोटं असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे, या प्रकरणी महिलेवर अनेकांनी टीका केली आहे.

First published:

Tags: Baby died, Viral news