मुंबई 06 डिसेंबर : सोशल मीडियावर महाराष्ट्रातील एक प्रकरण भलतंच व्हायरल झालं. ज्याची चर्चा राज्यातच काय तर संपूर्ण देशभर होऊ लागली. खरंतर एका तरुणाने दोन जुळ्या बहिणीशी लग्न केल्याची ही बातमी होती आणि त्याचे फोटो देखील सर्वत्र जोरदार व्हायरल झाले. पण आता हे प्रकरण आणखी एका कारणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
हे प्रकरण सोलापुरातील आहे. जे समोर आल्यानंतर वेगवेगळे प्रश्न उपस्थीत केले जाऊ लागले. त्यामध्ये हिंदू समाज काय सांगतो. तसेच नवरा-बायकोच्या नात्यातील काही कायदे नियम या सगळ्या गोष्टींवर जोरदार चर्चा देखील होऊ लागल्या.
हे ही पाहा : VIDEO: एक वर अन् 2 वधू; जुळ्या बहिणींची एकाच तरुणासोबत सप्तपदी, सोलापूरकर शॉक!
एवढंच काय तर असे काही तरुण मंडळी आहेत. ज्यांना वाईट देखील वाटलं. कारण जिथे त्यांना लग्न करायला एक तरुणी मिळत नव्हती. पण या अतुलला मात्र दोन-दोन बायका मिळाल्या. तेही या तरुणींने स्वत:हून त्याच्यासमोर दोघींशी लग्न करण्याची अट ठेवली.
लोक आपआपल्या परीने या प्रकरणाला मजेदार तसेच गंभीरतेने घेत होते. या लग्नाच्या चर्चा ताज्याच होत्या, तोपर्यंत या प्रकरणात एक वेगळाच ट्वीस्ट आला आहे.
खरंतर जुळ्या बहिणींशी लग्न केलेल्या अतुलचं आधी देखील एक लग्न झालं आहे. तरी देखील त्याने हे विचित्र पाऊल उचललं. ज्यामुळे अतुलच्या पहिल्या बायकोने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अतुलच्या पहिल्या बायकोने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. राज्य महिला आयोगाकडे त्याच्या पत्नीने दाद मागितली आहे. त्यामुळे आता अतुल सोबतच त्या जुळ्या बहिणींवर देखील गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. आता या प्रकरणात पुढे काय घडणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking news, Social media, Top trending, Viral, Viral news