Home /News /viral /

VIDEO: LIVE दरम्यान रिपोर्टरला भरधाव कारने दिली धडक, 'मी ठीक आहे...' म्हणत पुन्हा सुरू केलं रिपोर्टिंग

VIDEO: LIVE दरम्यान रिपोर्टरला भरधाव कारने दिली धडक, 'मी ठीक आहे...' म्हणत पुन्हा सुरू केलं रिपोर्टिंग

लाइव्ह रिपोर्टिंग सुरू असतानाच एका कारने तिला मागून धडक (Hit by Car) दिली आणि ती जमिनीवर पडली. टोरीची कमाल म्हणजे पडल्यानंतरही तिनं आपलं बोलणं थांबवलं नाही.

व्हर्जिनिया, 21 जानेवारी: टीव्हीवर बातम्या देताना रिपोर्टर (Reporter) अर्थात वार्ताहर प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन तिथली बातमी सांगत असल्याचे आपण पाहतो. त्याला लाइव्ह रिपोर्टिंग (Live Reporting) म्हणतात. एखादी नैसर्गिक आपत्ती, दहशतवादी हल्ला किंवा लढाईच्या ठिकाणी जाऊनदेखील बातम्यांचं लाइव्ह रिपोर्टिंग केलं जात असल्याचं आपण पाहतो. अनेकदा असं लाइव्ह रिपोर्टिंग करत असताना, काही गमतीजमाती घडलेल्याही प्रेक्षकांना दिसतात. कधी आगंतुक पक्षी, कुत्रे एवढंच नव्हे तर कधीकधी आजूबाजूला असलेले लोकही रिपोर्टर, कॅमेरामन यांच्या कामात अडथळे आणताना दिसतात. तरीही रिपोर्टर आपलं काम करणं थांबवत नाहीत असंही दिसतं.अमेरिकेतील वेस्ट व्हर्जिनियामधील डनबारमधील (Dunbar) एका टीव्ही रिपोर्टरनं मात्र अशा एका प्रसंगी अगदी कमालीचं धैर्य दाखवत आपलं काम सुरू ठेवून सगळ्यांचं मन जिंकलं आहे. डब्ल्यूएसएझेड (WSAZ TV) टीव्हीची रिपोर्टर टोरी योर्गी (Tori Yorgi) वेस्ट व्हर्जिनियामधील डनबार इथून स्टुडिओत बसलेल्या अँकर टिम इरशी (Anchor Team Err) लाइव्ह रिपोर्टिंगच्या माध्यमातून संवाद साधत होती. हे लाइव्ह रिपोर्टिंग सुरू असतानाच एका कारने तिला  मागून धडक (Hit by Car) दिली आणि ती जमिनीवर पडली. टोरीची कमाल म्हणजे पडल्यानंतरही तिनं आपलं बोलणं थांबवलं नाही. ती पुन्हा उठली आणि कॅमेऱ्यासमोर उभी राहिली. त्यावेळी हे चॅनेल पाहत असणाऱ्या प्रेक्षकांनी ही घटना लाईव्ह पाहिलीच पण या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हे वाचा-अरे बापरे! जंगल सफारीवेळी पर्यटकांच्या गाडीतच घुसला सिंह; थरकाप उडवणारा VIDEO कारने धडक दिल्यानं जमिनीवर पडल्यानंतर काही सेकंदांनी, 'मला नुकतीच एका कारने धडक दिली, पण मी ठीक आहे टिम' असं सांगताना टोरी या व्हिडीओत दिसत आहे. एवढंच नव्हे तर ज्या कारने तिला धडक दिली त्या कारच्या महिला चालकानेदेखील (Lady Driver) टोरीची चौकशी केली. तिलाही टोरीने आपण बरे असल्याचं सांगितलं. या घटनेनंतर टोरी पुन्हा कॅमेऱ्यासमोर आली आणि तिनं सांगितलं की, मला नुकतीच एका कारने धडक दिली, पण मी नशीबवान आहे की मी पूर्णपणे बरी आहे. अँकरनेही टोरीची चौकशी केली. हफिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, या अपघातानंतर टोरी योर्गीला हॉस्पिटलमध्ये (इमर्जन्सी रूममध्ये ईआरमध्ये ) तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या लाइव्ह रिपोर्टिंगसाठी ती एकटीच कॅमेरा आणि माईक या दोन्ही गोष्टी सांभाळत होती. त्यामुळे कारनं धडक दिल्यानंतर खाली पडल्यावरदेखील तिनं आपलं बोलणं सुरू ठेवलं आणि नंतर उठून कॅमेराही ठीकठाक केला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ टिमोथी बर्क नावाच्या युझरने ट्विटरवर शेअर केला असून, ही क्लिप 36 लाखांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे. या व्हिडीओला 28 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी तोरीचं कौतुक केलं आहे. एका युझरनं म्हटलं आहे की, 'तोरी, 2022 मध्ये टेलिव्हिजनवर मी पाहिलेली ही सर्वात सकारात्मक गोष्ट आहे.' काहींनी मात्र नाराजीही व्यक्त केली. असा अपघात घडल्यानंतर कॅमेरा कट करणे अपेक्षित होते. तोरीनं रिपोर्टिंग चालू ठेवणं योग्य नव्हतं. तिला कारने धडक दिल्यानंतर त्यांनी कॅमेरा का बंद केला नाही? रिपोर्टिंग करताना झालेला अपघात प्रेक्षकांना दाखवला हे चांगले काम केले पण तिला कारने धडक दिल्यानंतरही ती रिपोर्टिंग करत राहील अशी अपेक्षा करणं चुकीचं होतं,' असं एका युझरनं म्हटलं आहे. कामावर प्रचंड निष्ठा ठेवणारे तोरीसारखे पत्रकार लोकांचा या क्षेत्रावरील विश्वास टिकवून ठेवण्यास मदत करत असून, अनेकांना प्रेरणा देणारे आहेत.
First published:

Tags: Live video viral

पुढील बातम्या