Home /News /viral /

कासव आणि मगरीमध्ये झाली ड्रग डील? पाहा तुफान VIRAL झालेला हा VIDEO

कासव आणि मगरीमध्ये झाली ड्रग डील? पाहा तुफान VIRAL झालेला हा VIDEO

सर्वात महत्वाची आणि मजेदार गोष्ट म्हणजे हे दोघे एकमेकांना केवळ पास करत नाही तर हाय फाईव्ह देखील करताना दिसून येत आहेत.

    न्यूयॉर्क, 07 सप्टेंबर : कोरोना व्हायरसच्या या संकटकाळात सगळेच त्रस्त आहेत. मात्र सोशल मीडियावर अनेक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये विविध जंगली प्राण्यांचा व्हिडीओ कधी व्हायरल होत असतो तर कधी पाळीव प्राण्यांचा. सध्या देखील अशाच प्रकारचा एका कासवाचा आणि मगरीच्या एक व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून 'गेटर्स डेअली' या अकाऊंटवरून हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. या अकाऊंटवरून अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ नेहमी अपलोड केले जातात. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो कि, एक छोटे कासव मोठ्या मगरीच्या समोरून आरामात पोहून जात आहे. मात्र यामध्ये सर्वात महत्वाची आणि मजेदार गोष्ट म्हणजे हे दोघे एकमेकांना केवळ पास करत नाही तर हाय फाईव्ह देखील करताना दिसून येत आहेत. कासव आणि मगरीचे हाय फाईव्ह असे या व्हिडिओला नाव देण्यात आले असून जवळपास 1 कोटी लोकांनी आतापर्यंत हा व्हिडीओ पहिला आहे. अनेकांना या दोघांच्या या मैत्रीमुळे सुखद धक्का बसला आहे. वाचा-VIDEO : बिबट्याच्या जबड्यातून मुलाला वाचवण्यासाठी आईनं केलं जीवाचं रान वाचा-सावधान! तुमच्या Facebook फ्रेंड लिस्टमध्येही Selene Delgado Lopez तर नाही ना? विशेष म्हणजे अमेरिकेमध्ये हा व्हिडीओ सर्वात जास्त लोकप्रिय झाला असून अनेकजण याची तुलना अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीशी करत आहेत. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट देखील केली आहे. यामध्ये एकाने कमेंट केली आहे कि, हे दोघे करू शकतात तर MAGA चळवळीचे आणि लिबरल्स देखील असे करू शकतात. अशा पद्धतीचे अनेक व्हिडीओ इंटरनेटवर नेहमी व्हायरल होत असतात. यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात असे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळे यावर्षी लोकांनी जंगली प्राण्यांमध्ये आणि वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये रस घेतल्याचे दिसून येत आहे. वाचा-टीव्हीवरील Spiderman प्रमाणेच थक्क करणारा रिअल लाइफमधील Spiderboy भारतात देखील विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अशा प्रकारचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. त्याचबरोबर अनेक प्रोफेशनल फोटोग्राफर आपले फोटो शेअर करत असतात.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Social media viral, Video viral

    पुढील बातम्या