Home /News /viral /

VIDEO: हे काय भलतंच! गर्लफ्रेंडला कारवर बांधून शहरभर फिरवलं, कारण ऐकून तुम्हीही हैराण व्हाल

VIDEO: हे काय भलतंच! गर्लफ्रेंडला कारवर बांधून शहरभर फिरवलं, कारण ऐकून तुम्हीही हैराण व्हाल

गर्लफ्रेंडचा आपल्यावर किती विश्वास आहे हे पाहण्यासाठी एका बॉयफ्रेंडने चक्क तिला कारच्या छतावर बांधून संपूर्ण शहरात फिरवलं आणि या प्रकाराचा व्हिडीओही (Russia trust test viral video) रेकॉर्ड केला.

मॉस्को, 5 ऑगस्ट : जगभरातील प्रेमी युगलांमध्ये एकमेकांवरील विश्वासावरुन अनेकदा वाद, भांडणं झाल्याचं समोर आलं आहे. नकळतपणे एकमेकांकडून त्यांच्या विश्वासाबाबत खर-खोटंही ठरवलं जातं. समोरची व्यक्ती आपल्यावर किती विश्वास ठेवते हे पाहण्यासाठी जोडप्यांकडून काही परीक्षाही घेतल्याचं पाहण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी अशाच एका ‘ट्रस्ट टेस्ट’ (Trust test) दरम्यान एका जोडप्याने उंदीर मारायचं औषध प्यायल्याचं समोर आलं होतं. आता रशियामध्येही (Russia trust test video) असाच एक जीवघेणा प्रकार समोर आला आहे. गर्लफ्रेंडचा आपल्यावर किती विश्वास आहे हे पाहण्यासाठी एका बॉयफ्रेंडने चक्क तिला कारच्या छतावर बांधून संपूर्ण शहरात फिरवलं आणि या प्रकाराचा व्हिडीओही (Russia trust test viral video) रेकॉर्ड केला. रशियामध्ये राहणारा सर्जेई कोसेन्को (Sergey Kosenko) हा एक सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर आहे. त्याने स्वतःच या विचित्र आणि जीवघेण्या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Sergey Kosenko trust test) शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसतंय, की त्याने आपल्या गाडीच्या छतावर आपल्या गर्लफ्रेंडला बांधलं आहे, आणि तशाच अवस्थेत ते मॉस्को शहरातून फिरत आहेत. रस्त्यावरुन जाणारे सर्वच जण या अजब प्रकाराकडे पाहून आश्चर्यचकित होत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झालाय. यावर प्रतिक्रिया देणाऱ्या बहुतांश लोकांनी या प्रकाराला चुकीचं (Russia Trust Test reactions) म्हटलं आहे. एकमेकांवरील विश्वास तपासण्यासाठी असं करणं जिवावर बेतू शकतं असं लोक म्हणत लोकांनी कमेंट्समध्ये सर्जेईची चांगलीच खरडपट्टी काढली आहे.

हा पठ्ठ्या अडकला Ex-Girlfriend च्या खिडकीत, तिच्या घरात घुसण्याचा होता विचार पण.

या व्हिडीओमध्ये सर्जेईने आपल्या एका हातात हातकडी (Handcuff) घातली आहे. याचं दुसरं टोक त्याने आपल्या प्रेससीच्या (Sergey Kosenko viral video) हातात घातलं आहे. आपल्या गर्लफ्रेंडच्या ‘सुरक्षेसाठी’ त्याने तिला दोरी आणि टेपच्या सहाय्याने छताला बांधलं होतं. विशेष म्हणजे या सर्वात सर्जेई स्वतःच एका हाताने गाडी चालवत होता.

अरे बापरे! नवरीला किस करताच बेशुद्ध झाला नवरा, धाडकन स्टेजवर कोसळला; पाहा VIDEO

दरम्यान, पोलिसांनी या प्रकाराची दखल घेत सर्जेईवर कारवाई केली आहे. त्याला मोठा दंड ठोठावण्यात (Sergey Kosenko Fine) आला आहे. तसंच, सोशल मीडियावरील या व्हिडीओच्या आधारे पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी केलेली कारवाई आणि लोकांच्या प्रतिक्रियांमुळे सर्जेईने आपल्या या स्टंटसाठी माफी मागितली आहे. त्याने यापूर्वीही आपल्या गर्लफ्रेंडसोबत अशा प्रकारचे ट्रस्ट टेस्ट व्हिडीओ केले होते.
First published:

Tags: Instagram, Viral video.

पुढील बातम्या