Home /News /viral /

या पट्ट्यांमध्ये आणि ठिपक्यांमध्ये दडलेत काही शब्द; तुम्ही सोडवू शकाल का हे ऑप्टिकल इल्युजन्स?

या पट्ट्यांमध्ये आणि ठिपक्यांमध्ये दडलेत काही शब्द; तुम्ही सोडवू शकाल का हे ऑप्टिकल इल्युजन्स?

तुम्ही ऑप्लिकल इल्युजन (Optical Illusions) प्रकारची कोडी आतापर्यंत पाहिली असतीलच. यांमध्ये समोर दिसणारी गोष्ट आपण कोणत्या बाजूने किंवा कोणत्या दृष्टीकोनातून पाहत आहोत, यानुसार त्यांचा अर्थ बदलत जातो.

नवी दिल्ली, 13 मे : कोडी सोडवायला कोणाला आवडत नाही? कोडी सोडवताना केवळ आपला चांगला टाईमपास नाही होत, तर आपल्या बुद्धीलाही बरीच चालना (Riddles Help Sharpen Mind) मिळते. तुम्ही ऑप्लिकल इल्युजन (Optical Illusions) प्रकारची कोडी आतापर्यंत पाहिली असतीलच. यांमध्ये समोर दिसणारी गोष्ट आपण कोणत्या बाजूने किंवा कोणत्या दृष्टीकोनातून पाहत आहोत, यानुसार त्यांचा अर्थ बदलत जातो. आज आपण अशाच प्रकारचे काही ऑप्टिकल इल्युजन (Trending Optical Illusions) पाहणार आहोत. या फोटोकडे तुम्ही पाहिलं, तर सुरूवातीला तुम्हाला लाल रंगाच्या अनेक पट्ट्या दिसतील. मात्र, जरा नीट लक्ष दिलं तर या पट्ट्यांमध्येच MORE ही अक्षरं दडलेली (Optical Illusion Answers) दिसून येतील. जर तुम्हाला ही अक्षरं शोधणं अवघड वाटत असेल, तर पुढचे काही फोटो नक्कीच पाहा. या फोटोमध्ये पिवळ्या रंगाच्या बॅकग्राउंडवर भरपूर हिरवे ठिपके दिसून येतील. या ऑप्टिकल इल्युजनमध्ये नीट पाहिल्यास तुम्हाला MILE ही अक्षरं दिसतील. विशेष म्हणजे, हे सर्व ठिपके एका ठिकाणी स्थिर असूनही, तुम्हाला ते हलताना दिसतील. त्यामुळे या फोटोमध्ये दडलेली अक्षरं शोधणं थोडं अवघडच आहे. हे ऑप्टिकल इल्युजनही आधीसारखंच आहे. मात्र यामध्ये हिरवे नाही, तर निळे ठिपके आहेत. याचं वैशिष्ट्य म्हणजे, हे ठिपके थोडे मोठे आहेत. शिवाय या ठिपक्यांचा पॅटर्नदेखील तुम्हाला मध्ये-मध्ये तुटलेला वाटेल. या तुटलेल्या पॅटर्नमध्येच या कोड्याचं उत्तर दडलंय. तुम्ही नीट पाहिलं तर यामध्ये तुम्हाला NEAR ही अक्षरं दडलेली दिसतील. या आधीच्या सर्व इल्युजन्सच्या तुलनेत हे कदाचित सगळ्यात सोपं असावं. यामध्ये झेब्र्याच्या अंगावर असतात त्याप्रमाणे काळ्या-पांढऱ्या पट्ट्या दिसून येतील. नीट पाहिलं तर या पट्ट्यांमध्ये DOG ही अक्षरं दडलेली तुम्ही पाहू शकाल.

हे वाचा - VIDEO: हवामान बदलाचा भयानक परिणाम? काही क्षणातच पाण्यासोबत पाहून गेलं 3 कोटीचं घर

या फोटोमध्ये असलेल्या डिझाईनचा फिक्स असा पॅटर्न नाहीये. त्यामुळे यातील अक्षरं ओळखणं सगळ्यात अवघड आहे. थोडं नीट पाहिलं तर फोटोच्या मध्ये तुम्हाला WALK ही अक्षरं दिसतील. या सगळ्या ऑप्टिकल इल्युजन्समध्ये एक गोष्ट सारखी आहे, ती म्हणजे सर्वांची उत्तरं, म्हणजेच सर्व फोटोंमध्ये दडलेले शब्द हे फोटोच्या मध्यभागी आहेत. ही इल्युजन्स सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल (Viral optical illusions) होत आहेत. बहुतांश लोकांना ही सोडवल्याचं समाधान मिळत आहे. कित्येकांनी कमेंट्समध्ये याची उत्तरंही दिली आहेत. तुमच्यासाठी हे शेवटचं आणि सर्वांत अवघड असं ऑप्टिकल इल्युजन. 99 टक्के लोकांना याचं उत्तर सोडवता आलं नाहीये, हे विशेष. या इल्युजनमध्ये BAD EYES हे शब्द दडले आहेत. तुम्हीही पहा, तुम्हाला हे शब्द सापडतात का?
First published:

Tags: Photo viral

पुढील बातम्या