मराठी बातम्या /बातम्या /Viral /

नातू असावा तर असा ! आजीला खूर्चीत बसवून या पठ्ठ्याने असा खेळला गरबा... पाहा VIDEO

नातू असावा तर असा ! आजीला खूर्चीत बसवून या पठ्ठ्याने असा खेळला गरबा... पाहा VIDEO

आजीला घराबाहेर जाऊन गरबा खेळता येत नाही म्हणून या नातवाने आजीसाठी घरातच गरबा खेळला आहे. आजी –नातवाचा गरबा खेळतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच हिट होत आहे.

    मुंबई,25 ऑक्टोबर: आजच्या जगात माणुसकी, वडिलधाऱ्यांचा आदर या गोष्टी कमी होत चालल्या आहेत असं म्हटलं जातं. विशेष म्हणजे आजकालची मुलं आपल्या आजी – आजोबांचा आदर करत नाहीत अशीही ओरड असते. पण हा अगदीचं खरं नाहीये बरं का. आपल्या म्हाताऱ्या आजीला गरबा खेळण्याचा आनंद मिळावा यासाठी एक नातवाने घरच्या घरीच गरब्याची सोय केली. आपल्या आजीला खूर्चीत बसवून हा नातू घरातल्या घरातच आजीसोबत गरबा खेळत आहे. गरब्याचं गाणं लावून दोघंही मस्तपैकी गरबा खेळण्याच आनंद घेत आहेत. वयोमानानुसार या आज्जींना घराबाहेर पडून गरबा खेळणं शक्य होत नाही. त्यामुळे या म्हाताऱ्या आजीला वाईट वाटत होतं. पण तिच्या नातवाने तिची चिंता दूर केली. आजी घराबाहेर जाऊ शकत नाही म्हणून काय झालं? या नातवाने आजीसाठी घरातच गरबा आणला. प्रियांका शुक्ला यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. आजीसोबत प्रेमाने गरबा खेळणाऱ्या या मुलांचं नेटकऱ्यांनाही कौतुक केलं आहे. ट्विटरवर हा व्हिडीओ आत्तापर्यंत 1 लाखापेक्षा जास्त लोकांनी बघितला आहे. या व्हीडीओवर अनेकांनी अतिशय सुंदर कॉमेंट्स केल्या आहेत. आजी नातवाच्या अनोख्या गरब्याचं फारच कौतुक होत आहे. आजच्या युगात स्वत:ची मजा, स्वत:चा मित्रपरिवार यातून मुलांना घरातल्या लोकांशी बोलायलाही वेळ नसतो. या नातवाने आपल्या आजीच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं आहे.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Viral video.

    पुढील बातम्या