मराठी बातम्या /बातम्या /Viral /घोड्याने चक्क ढोलाच्या तालावर धरला ठेका, कधीही पाहिला नसेल असा डान्स, VIDEO VIRAL

घोड्याने चक्क ढोलाच्या तालावर धरला ठेका, कधीही पाहिला नसेल असा डान्स, VIDEO VIRAL

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर रोज काहीतरी नवीन व्हायरल होत असलेलं पहायला मिळतं. व्हायरल व्हिडीओंचा सोशल मीडियावर सडा पडलेला पहायला मिळतो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी : सोशल मीडियावर रोज काहीतरी नवीन व्हायरल होत असलेलं पहायला मिळतं. व्हायरल व्हिडीओंचा सोशल मीडियावर सडा पडलेला पहायला मिळतो. प्रत्येक प्रकारचा व्हिडीओ तुम्हाला सोशल मीडियावर फिरताना दिसेल. नेटकरीही वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पहायला पसंत करतात. अशातच घोडा डान्स करतानाचा व्हिडीओ सध्या लक्ष वेधत आहे. हा व्हिडीओ पाहून सगळेच थक्क झाले असून व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पहायला मिळत आहे, घोडा ढोलाच्या आवाजावर जबरदस्त डान्स करत आहे. वर खाली पाय घेत घोडा ढोलाच्या तालावर नाचू लागताच आजूनबाजूला असलेले लोक त्याला आश्चर्यचकित झाले आहेत. एक व्यक्ती घोड्याला हाताळतानाही दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून घोड्याला याचं ट्रेनिंग दिल्याचं समजत आहे.

घोड्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत आहे. हा व्हिडीओ khillar_premi_karmalkar या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर अनेक प्रतिक्रियाही येताना दिसत आहे. अनेक मजेशीर आणि आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिसत आहे.

दरम्यान, घोड्याच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. यापूर्वी असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. असे व्हिडीओ सोशल मीडियावर लवकर व्हायरल होतात आणि इंटरनेटवर धुमाकूळ घालतात. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ सर्सास पहायला मिळत असून लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो.

First published:

Tags: Top trending, Video viral, Viral, Viral news