मराठी बातम्या /बातम्या /Viral /ट्रान्सजेंडर जोडपं गर्भधारणेद्वारे होणार पालक; मार्चमध्ये बाळाचा जन्म होण्याची शक्यता

ट्रान्सजेंडर जोडपं गर्भधारणेद्वारे होणार पालक; मार्चमध्ये बाळाचा जन्म होण्याची शक्यता

सोर्स : गुगल

सोर्स : गुगल

दोन वर्षांपूर्वी लिंग संक्रमणाची प्रक्रिया सुरू करणाऱ्या जहाद आणि झिया यांनी बुधवारी इन्स्टाग्रामवर ही आनंदाची बातमी जाहीर केली.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई 04 फेब्रुवारी : केरळमधील कोझिकोड येथे राहणारं एक ट्रान्सजेंडर जोडपं मार्चमध्ये त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. 23 वर्षांचा जहाद हा गर्भधारणेद्वारे गरोदर होणारा भारतातील पहिला ट्रान्स पुरूष ठरला आहे. जहाद आपली 21 वर्षांची जोडीदार ट्रान्सवुमन झिया पावल हिच्यासोबत राहतो. दोघेही गेल्या तीन वर्षांपासून एकत्र आहेत.

  दोन वर्षांपूर्वी लिंग संक्रमणाची प्रक्रिया सुरू करणाऱ्या जहाद आणि झिया यांनी बुधवारी इन्स्टाग्रामवर ही आनंदाची बातमी जाहीर केली.

  "जरी मी जन्मानं किंवा शरीरानं स्त्री नसले तरी, माझ्या मनात एक स्त्रीसुलभ स्वप्न होतं की, एक बाळ मला 'आई' म्हणेल….आम्ही एकत्र आहोत त्याला तीन वर्षे झाली आहेत. आई होण्याच्या माझ्या स्वप्नाप्रमाणेच त्याचं (जहाद) वडील होण्याचं स्वप्न आहे आणि आज त्याच्या पूर्ण इच्छेनं एक आठ महिन्यांचा जीव त्याच्या पोटात वाढत आहे...आमच्या माहितीप्रमाणे ही भारतातील पहिली ट्रॅन्स मॅन प्रेग्नन्सी आहे," अशा मल्याळम कॅप्शनसह झियानं इन्स्टाग्राम पोस्ट करून गर्भधारणेची घोषणा केली.

  जहाद एक अकाउंटंट आहे. सध्या त्याच्या गरोदरपणाचं तिसरं ट्रायमेस्टर सुरू आहे. जहाद एक स्त्री म्हणून जन्माला आला होता. सध्या तो हार्मोन थेरेपीद्वारे पुरुष होण्याच्या प्रक्रियेत आहे. त्याने गेल्या वर्षीच्या सुरुवातीला पालकत्व स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू केली होती.

  झिया एक शास्त्रीय नृत्य शिक्षिका आहे. ती एक पुरुष म्हणून जन्माला आली होती. सध्या ती थेरेपीद्वारे स्त्रीमध्ये रूपांतरित होण्याच्या प्रक्रियेत आहे.

  झियानं इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की, "जेव्हा आम्ही तीन वर्षांपूर्वी एकत्र राहू लागलो तेव्हा आम्हाला वाटलं की, आमचं जीवन इतर ट्रान्सजेंडरपेक्षा वेगळं असावं. बहुसंख्य ट्रान्सजेंडर जोडप्यांवर समाज तसंच त्यांचे कुटुंबीय बहिष्कार टाकतात. आम्हाला बाळ हवं होतं. जेणेकरुन आम्ही हे जग सोडून गेल्यानंतरही आमचं स्वत:चं असं काहीतरी या जगात शिल्लक राहील."

  ती पुढे असंही म्हणाली, "ट्रान्स मॅन आणि ट्रान्स वुमन बनण्याचा आमचा प्रवास सुरूच राहील. ट्रान्स वुमन होण्यासाठी मी अजूनही हार्मोन ट्रीटमेंट सुरू ठेवत आहे. प्रसूतीनंतर सहा महिने किंवा एक वर्षानंतर, जहाद ट्रान्स मॅन होण्यासाठी पुन्हा उपचार सुरू करेल."

  जहादवर स्तन काढण्याची शस्त्रक्रिया केली जाणार होती. मात्र, गर्भधारणेसाठी ती थांबवण्यात आली आहे. जियानं तिचे कुटुंबीय आणि डॉक्टरांच्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.

  First published:

  Tags: Shocking, Social media, Social media trends, Top trending, Viral