मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO: माणसापेक्षाही शिस्तबद्ध असलेला अनोखा कुत्रा; मालकाच्या रक्षणासाठी लावतो जीवाची बाजी!

VIDEO: माणसापेक्षाही शिस्तबद्ध असलेला अनोखा कुत्रा; मालकाच्या रक्षणासाठी लावतो जीवाची बाजी!

एखाद्या कुत्र्याला खास ट्रेनिंग (Trained Dog) दिली गेली तर ईमानदारीसोबतच त्याच्या शक्तीचं आणि जिद्दीचं खास प्रदर्शनही होतं. सध्या असाच एक अनोखा व्हिडिओ व्हायरल होत आहे

एखाद्या कुत्र्याला खास ट्रेनिंग (Trained Dog) दिली गेली तर ईमानदारीसोबतच त्याच्या शक्तीचं आणि जिद्दीचं खास प्रदर्शनही होतं. सध्या असाच एक अनोखा व्हिडिओ व्हायरल होत आहे

एखाद्या कुत्र्याला खास ट्रेनिंग (Trained Dog) दिली गेली तर ईमानदारीसोबतच त्याच्या शक्तीचं आणि जिद्दीचं खास प्रदर्शनही होतं. सध्या असाच एक अनोखा व्हिडिओ व्हायरल होत आहे

नवी दिल्ली 28 नोव्हेंबर : जगात भरपूर असे लोक असतात ज्यांचं प्राण्यांवर विशेष प्रेम (Animal Lovers) असतं. यातील अनेक लोक असे असतात जे प्राणी पाळतात तर अनेक लोक असेही असतात जे त्यांना विशेष प्रशिक्षणही देतात. ज्या लोकांकडे पाळीव कुत्रा असेल त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती असेल की हे श्वान आपल्या मालकावर किती प्रेम करतात. अशात एखाद्या कुत्र्याला खास ट्रेनिंग (Trained Dog) दिली गेली तर ईमानदारीसोबतच त्याच्या शक्तीचं आणि जिद्दीचं खास प्रदर्शनही होतं. सध्या असाच एक अनोखा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एक व्यक्ती आपल्या पाळीव कुत्र्यासोबत वेगवेगळे पराक्रम दाखवताना दिसतो.

नुकतंच फेसबुक पेज न्यूजनरवर एक जबरदस्त व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एक माणूस आपल्या पाळीव जर्मन शेफर्ड कुत्र्यासोबत अनोखा पराक्रम करताना दिसत आहे (Trained German Shephard Dog Video). व्हिडिओ पाहून हे स्पष्ट होतं की त्या व्यक्तीने कुत्र्याला खूप खास ट्रेनिंग दिलं आहे, त्यानंतर तो एखाद्या सैनिकासारखा सतर्क आणि शिस्तबद्ध दिसत आहे.

50 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळालेल्या या व्हिडिओमध्ये कुत्रा असे पराक्रम करत आहे जे इतर कुत्र्यांला करणं अशक्य आहे (German Shephard Dog Stunts). तो त्याच्या मालकाच्या सूचनांचे पालन करून चालतो आणि थांबतो. एवढंच नाही तर त्याच्या मालकाने त्याला वेगात धावायला सांगितल्यावर तो जीव मुठीत धरून धावतो. मालकाने थांबायला सांगताच तो जागीच थांबतो आणि घसरत काही अंतर पुढे जातो. इतकंच नाही तर सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा ट्रेनर जर्मन शेफर्ड डॉगसमोर एखादी गोष्ट फेकतो तेव्हा हा कुत्रा लगेच ती पकडत नाही. तर तो आपल्या मालकाच्या परवानगीची वाट बघतो. मालकाने सांगताच लगेचच तो सामान घेऊन येतो.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर लाखो लोकांनी लाईक केला आहे आणि हजारो लोकांनी यावर कमेंटही केल्या आहेत. लोक या कुत्र्याचा चपळपणा पाहून थक्क झाले आहेत. एका महिलेनं व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, की हा कुत्रा अतिशय खास आहे. कुत्रा आणि त्याच्या मालकाचं बॉन्डिंग पाहून वाटतं की त्यांच्यात खूप प्रेम आहे. आणखी एका व्यक्तीने लिहिलं, मला त्या व्यक्तीची दया येत आहे, जो या कुत्र्याच्या मालकासोबत पंगा घेईल. त्याची अवस्थाच वाईट होईल.

First published:
top videos

    Tags: Dog, Video Viral On Social Media