बंगळुरू 07 जुलै : काही अपघात अतिशय भीतीदायक आणि थरकाप उडवणारे असतात. विशेषतः ट्रेनचे अपघात तर अतिशय भयानक असतात, जे पाहूनच अंगावर काटा येतो. धावत्या ट्रेनच्या समोर आलेली कोणतीही वस्तू किंवा व्यक्तीची काय अवस्था होते, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. सध्या अशाच एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे (Train Collided With Truck video) .
VIDEO - हिरोसारखी वाऱ्याच्या वेगाने पळवत होता बाईक; गर्लफ्रेंडसह हवेत उडाला तरुण
एका ट्रकला ट्रेनची जबरदस्त धडक बसल्याचं (Train Collides With Truck) या व्हिडिओ क्लिपमध्ये पाहायला मिळतं. कर्नाटकातातील बिदर रेल्वे क्रॉसिंगवर अडकलेल्या ट्रकला ट्रेनने धडक दिल्याचा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. एएनआयने ट्विटरवर या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसतं, की ट्रेन ट्रकला धडकण्याआधी तिथे असलेले लोक रूळावरुन पळ काढतात. यामुळे सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं सांगितलं जात आहे.
#WATCH Bidar, Karnataka | A train collided with a truck at Bhalki crossing, early this morning. No injury reported pic.twitter.com/9xYUUZTpcy
या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याचं ट्विटमध्ये म्हटलं आहे. ही धडक झाल्यानंतर प्रवासी ट्रेनचा वेग कमी झाल्याचं पाहायला मिळतं. यानंतर ट्रेन घटनास्थळापासून काही मीटर अंतरावरच जाऊन थांबली. ट्रकला धडकल्यानंतर लोको पायलटने तात्काळ ब्रेक मारल्याचं पाहायला मिळतं. ही संपूर्ण थरारक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Published by:Kiran Pharate
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.