मराठी बातम्या /बातम्या /Viral /

प्लॅटफॉर्मवर रेल्वे येताना दिसतानाच प्रवाशांनी सुरू केला डान्स, जाणून घ्या त्या मागील कारण

प्लॅटफॉर्मवर रेल्वे येताना दिसतानाच प्रवाशांनी सुरू केला डान्स, जाणून घ्या त्या मागील कारण

फ्लॅटफॉर्मवर रेल्वे येताच प्रवाशांनी सुरू केला डान्स

फ्लॅटफॉर्मवर रेल्वे येताच प्रवाशांनी सुरू केला डान्स

रेल्वे दिसताच का नाचायला लागले प्रवासी; पाहा इथे

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 30 नोव्हेंबर : तुम्हाला गावाला लवकर जायचं असेल, आणि तुम्ही रेल्वे स्थानकावर गेल्यानंतर तुम्हाला ज्या रेल्वेनं जायचं आहे, ती गाडीच उशिरा येणार असेल तर? अनेकांचा रागावर पारावर उरणार नाही. रेल्वेला जास्त उशीर होणार असेल, तर काहीजण प्रवासासाठी बस किंवा खासगी वाहन असा पर्याय शोधतील. पण गाडी उशिरा आल्यामुळे सहसा कोणी आनंद व्यक्त करणार नाही. मात्र, तुम्ही जर असा विचार करत असाल तर कदाचित सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ तुमचं हे मत चुकीचं ठरवू शकतो. कारण एका रेल्वे स्थानकावर रेल्वे तब्बल नऊ तास उशिरा आल्यानंतर प्रवाशांनी ज्या पद्धतीनं तिचं स्वागतं केलं आहे, ते पाहून तुम्हाला या प्रवाशाचं खरचं कौतुक करावं का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. ‘नवभारत टाइम्स’ने याबाबत वृत्त दिलंय.

रेल्वे स्टेशनवर वेळेवर पोहोचल्यानंतर गाडीला उशीर होणार आहे, हे जेव्हा समजतं तेव्हा अनेक प्रवासी त्रासतात. अनेकांना रेल्वे प्रशासनाचा रागही येतो. काहीजण तर 'भारतीय रेल्वे'ला शिव्याशाप देऊ लागतात. अशावेळी ज्यांची रेल्वे 9 तास उशिरानं आली, त्या लोकांची काय अवस्था झाली असेल, याची आपण कल्पनासुद्धा न केलेली बरी. कारण अशा प्रवाशांचा संताप अनावर होईल ना? पण हा व्हिडिओ पाहून तुम्ही थक्क व्हाल! एका प्लॅटफॉर्मवर प्रवासी त्यांच्या गाडीची वाट पाहत होते, पण त्यांची रेल्वे तब्बल 9 तास उशिरा आली. अशा स्थितीत प्रवाशांच्या एका ग्रुपनं प्लॅटफॉर्मवर त्यांची रेल्वे येताना पाहिल्यावर आनंदानं उड्या मारल्या, आणि नाचायला सुरुवात केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रवाशांच्या ग्रुपचा संयम बघून काहींनी, ‘आयुष्यात एवढा संयम हवा!’ अशा कमेंटही दिल्या आहेत.

हेही वाचा - जिथं गेला तिथं केलं लग्न! 4 राज्यात 6 संसार करणाऱ्याचं असं फुटलं भांडं

@bonthu_hardik या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘आमची ट्रेन 9 तास लेट होती. ती आली तेव्हा लोकांनी कसा प्रतिसाद दिला, ते पहा.’ या क्लिपला आतापर्यंत 6.8 हजार व्ह्युज आणि 200 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसंच, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक युजर्स कमेंट देत आहेत. एका व्यक्तीनं कमेंट दिली आहे की, ‘असा आहे माझा देश...’ दुसऱ्यानं लिहिलंय, ‘भारतात कोणतीही समस्या असो, लोक मीम्स बनवतात.’ आणखी एकानं कमेंट दिली आहे की, ‘भारतात हे सामान्य आहे.’ तर, ‘लाईट आल्याचा आनंद आणि ट्रेन लेट आल्याचा आनंद आता एकसारखाच झाला आहे’, ‘देश खरंच बदललाय!’ अशा कमेंटही या व्हिडिओवर आल्या आहेत.

दरम्यान, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विशेष ठरला असून तो वेगानं व्हायरलं होत आहे.

First published:

Tags: Video viral, Video Viral On Social Media