मराठी बातम्या /बातम्या /Viral /

भयंकर अपघात! रेल्वेनं धडक मारताच हवेत उडाल्या गाड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO

भयंकर अपघात! रेल्वेनं धडक मारताच हवेत उडाल्या गाड्या, अंगावर काटा आणणारा VIDEO

ट्रकवर अधिक भार असल्यामुळे हा ट्रक रुळ पार करू शकला नाही. व्हायरल होणारा हा व्हिडिओ पाहून सर्वच हैराण झाले आणि अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या.

    नवी दिल्ली 22 ऑक्टोबर : सोशल मीडिया (Social Media) एक असा प्लॅटफॉर्म आहे ज्यावर तुम्हाला अनेक व्हायरल पोस्ट (Viral Photo) पाहायला मिळतील. अनेकदा तुम्ही डोळ्यांसमोर अपघात पाहिले असतील. मात्र, आता जो अपघाताचा व्हिडिओ (Accident Video) समोर आला आहे, तो हैराण करणारा आहे. या दुर्घटनेत एमट्रॅक ट्रेननं एका छोट्या ट्रकला जबरदस्त टक्कर मारली. या ट्रकवरुन कारची वाहतूक केली जात होती. ही घटना शुक्रवारी अमेरिकेच्या ओक्लाहोमा येथील थॅकरविलेमध्ये घडली. या घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ (Shocking Video Viral) समोर आला आहे. मदतीसाठी धावलेल्या तरुणांवर झेपावला बिबट्या आणि...; बचावाचा धडकी भरवणारा VIDEO याचे काही फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर (Facebook) शेअर केले गेले आहेत. हे फोटो लव्ह काउंटी फायरफायटर्सच्या पेजवर तुम्ही पाहू शकता. अॅडमिननं हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, ट्रकचा पुढचा भाग रुळावर उतरला. यामुळे रेल्वे रुळाच्या काही भागाचं किरकोळ नुकसान झालं आणि ट्रेनला पुढे जाण्यात अडथळा आला. विभागाने सांगितलं की बीएनएसएफ, एमट्रॅक आणि फेडरल रेलरोड प्रशासनाचे निरीक्षक कमांडला मदत करण्यासाठी आणि ट्रॅक आणि ट्रेनच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. ट्रकवर अधिक भार असल्यामुळे हा ट्रक रुळ पार करू शकला नाही. व्हायरल होणारा हा व्हिडिओ पाहून सर्वच हैराण झाले आणि अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या. मिळालेल्या माहितीनुसार एमट्रॅक ट्रेनमध्ये बसलेले पाच प्रवासी जखमी झाले आहेत आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कोणी बोनेटवर तर कोणी समोर; सिंहांनी चारचाकीला घेरलं अन्..; धडकी भरवणारा VIDEO एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, मला त्या व्यक्तीच्या वेदनांची कल्पना आहे आणि आनंद आहे की त्यांना काही झालं नाही. इतरही अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Accident, Shocking video viral

    पुढील बातम्या