VIDEO : मोबाइल पाहताना रुळावर जाऊन पडली महिला आणि समोरून आली ट्रेन

VIDEO : मोबाइल पाहताना रुळावर जाऊन पडली महिला आणि समोरून आली ट्रेन

आपण सगळेच मोबाइल पाहण्यात इतके दंग असतो की कधीकधी त्यामुळे अपघात होऊ शकतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहिलात तर तुम्हाला धक्काच बसेल.

  • Share this:

मुंबई, 1 नोव्हेंबर : आपण सगळेच मोबाइल पाहण्यात इतके दंग असतो की कधीकधी त्यामुळे अपघात होऊ शकतात. आपल्या आसपासही आपण अशा घटना बघत असतो पण ही घटना घडलीय स्पेनच्या माद्रिदमध्ये. रेल्वे स्टेशनवर एक महिला मोबाइल फोन बघतबघत रुळांवर पडली आणि समोरून एक ट्रेन आली.

हा व्हिडिओ मेट्रो दे मॅड्रिडने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ही महिला मोबाइलवर बिझी आहे आणि चालताचालता ती रुळांवर पडली. त्याच वेळी त्या प्लॅटफॉर्मवर ट्रेन आली.

हा व्हिडिओ इथेच थांबला. त्यामुळे या महिलेचं काय झालं ते कळू शकलं नाही. पण नंतर मात्र ही महिला गंभीररित्या जखमी झालेली नाही, असं मेट्रो दे मॅड्रिडने सांगितलं. ही घटना स्पेनमध्ये घडली असली तरी सगळ्यांनीच यातून शिकण्यासारखं आहे.

सोशल मीडियावरही याबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. एका प्रवाशाने म्हटलं आहे, तुमच्या सुरक्षेसाठी प्लॅटफॉर्मवर चालताना मोबाइल बघू नका. खरंतर प्लॅटफॉर्मवरच नाही तर एरव्हीही मोबाइलचा वापर करताना खबरदारी घ्यायला हवी.

==================================================================================================

VIDEO : सोनिया गांधींसोबतच्या बैठकीत सेनेबद्दल काय निर्णय झाला? बाळासाहेब थोरात म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2019 08:30 PM IST

ताज्या बातम्या