• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • रूबाब! एका मांजरीसाठी वाहतूक पोलिसाने सर्व गाड्या थांबवल्या; ऐटीत ओलांडला रस्ता, पाहा VIDEO

रूबाब! एका मांजरीसाठी वाहतूक पोलिसाने सर्व गाड्या थांबवल्या; ऐटीत ओलांडला रस्ता, पाहा VIDEO

या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की एक वाहतूक पोलीस गाड्या थांबवून मांजरीला रस्ता ओलांडण्यासाठी मदत करतो (Cat Crossed the Road).

 • Share this:
  नवी दिल्ली 20 नोव्हेंबर : आजच्या काळात काहीत अशक्य नाही, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. आजकाल लोक काहीही शक्य करून दाखवतात. सध्या समोर आलेली एक बातमीही अशीच आहे. ही बातमी वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल की एखादा वाहतूक पोलीस असं कसं करू शकतो. तुम्ही सोशल मीडियावर (Social Media) प्राण्यांचे अनेक व्हायरल व्हिडिओ (Viral Videos of Animals) पाहिले असतील. मात्र सध्या समोर आलेला व्हिडिओ अतिशय खास आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी वाहतूक पोलिसाचंही (Traffic Police) कौतुक केलं आहे. प्राण्यांच्या अपघातांच्या घटनांमध्येही मागील काही काळापासून वाढ झाली आहे. कधी रस्त्यावरील अपघातात तर कधी रेल्वे अपघातात अनेक प्राण्यांना आपला जीव गमवावा लागतो. जितका त्रास माणसांना होतो तितकाच मुक्या जीवांनाही होतो. त्यामुळे प्राणी आणि माणसात भेदभाव का करायचा? सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की एक वाहतूक पोलीस गाड्या थांबवून मांजरीला रस्ता ओलांडण्यासाठी मदत करतो (Cat Crossed the Road). हा व्हिडिओ इंडोनेशियाचा असल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केला गेला आहे. तुम्ही हा व्हिडिओ Ramblings नावाच्या पेजवर पाहू शकता. पेजच्या अॅडमिनने जेनिफर रॉकवूड यांच्या काही ओळी शेअर केल्या आहेत. यात लिहिलं आहे, तुम्हाला याची कल्पनाही नसते की तुम्ही समोरच्याच्या आयुष्याच किती प्रकाश आणत आहात. केवळ तुमची दया आणि एक सुंदर उदाहरण. हा व्हिडिओ हजारो लोकांनी लाईक केला असून अनेकांनी यावर कमेंटही केल्या आहेत. एका यूजरनं यावर कमेंट करत लिहिलं, हा व्हिडिओ खरंच खूप सुंदर आहे. आजच्या काळात असे लोक फार कमी पाहायला मिळतात. आणखी एकानं लिहिलं की ही मांजरही अगदी हुशार आहे, तिलाही माहिती आहे की पोलिसाच्या सुचना कशा फॉलो करायच्या. आणखी एकानं लिहिलं की अशा पोलिसाला माझा सलाम. याशिवायही अनेकांनी यावर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published: