मराठी बातम्या /बातम्या /Viral /

अरे देवा! कोरोनामुळे टॉयलेट पेपरचा तुटवडा, न्यूज पेपरनं रिकामी सोडली पानं

अरे देवा! कोरोनामुळे टॉयलेट पेपरचा तुटवडा, न्यूज पेपरनं रिकामी सोडली पानं

ट्विटरवर #ToiletPaperEmergency आणि #ToiletPaperApocalypse असे दोन हॅशटॅश ट्रेन्ड होत आहेत.

ट्विटरवर #ToiletPaperEmergency आणि #ToiletPaperApocalypse असे दोन हॅशटॅश ट्रेन्ड होत आहेत.

ट्विटरवर #ToiletPaperEmergency आणि #ToiletPaperApocalypse असे दोन हॅशटॅश ट्रेन्ड होत आहेत.

  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई, 08 मार्च : जगभरात कोरोना व्हायरसचा कहर वाढत आहे. याचा परिणाम वस्तू, सेवा आणि आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात झाल्याचं दिसून येत आहे. आतापर्यंत 80 देशांमध्य कोरोना व्हायरस घुसला असून हजारो लोकांना लागण झाली आहे. दिवसेंदिवस याची संख्या वाढत असल्यानं भीतीचं वातावरण आहे. तर याचा परिणाम वस्तू आणि सेवांवर मोठ्या प्रमाणात झाल्याचं पाहायला मिळत आहे. कुठे सॅनिटायझर तर कुठे इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू तर कुठे औषधांचा साधा आणि पुरवठ्यातली तूट पाहायला मिळत आहे. आता तर ऑस्ट्रेलियामध्ये या कोरोनामुळे चक्क टॉयलेट पेपरची कमतरता मोठ्य़ा प्रमाणात जाणवायला लागली आहे. या टॉयलेट पेपरच्या जागी लोक वृत्तपत्रांचा वापर करत आहेत. ट्विटरवर #ToiletPaperEmergency आणि #ToiletPaperApocalypse असे दोन हॅशटॅश ट्रेन्ड होत आहेत. लोकांची समस्या लक्षात घेऊन तिथल्या स्थानिक वृत्तपत्रांनी वृत्तपत्रातील काही पानं कोरी सोडली आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या व्हिडीओला 2 हजारहून अधिक लोकांनी रिट्विट केलं आहे. तर 6 हजारहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. युझर्सनी या व्हिडीओवर तुफान कमेंट्स केल्या आहेत.

'आम्ही वाचकांच्या समस्या समजून त्या वेळोवेळी आपल्या वृत्तपत्रात मांडत असतो. यावेळी नागरिकांची टॉयलेट पेपरची समस्याही आम्ही समजून घेतली आणि ती पूर्ण करण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही केला आहे.' असं या वृत्तपत्राच्या संपादकीय लेखात उल्लेख करण्यात आला आहे. नॉर्थ ऑस्ट्रेलियामध्ये गुरुवारी वृत्तपत्रात 8 ज्यादा पानांचा समावेश कऱण्यात आला होता. ही पानं कोरी सोडण्यात आली त्यावर केवळ वृत्तपत्राचा वॉटरमार्क छापण्यात आला होता. नागरिकांनी या पानांचा टॉयलेट पेपर म्हणून वापर करावा असं आवाहनही करण्यात आलं होतं.

हे वाचा-‘डान्स अगेन्स्ट द व्हायरस’, 'कोरोना'पासून वाचण्यासाठी पाहा हा Video

First published:

Tags: Corona virus, Twitter, Viral video.