2 वर्षाच्या मुलाने मोबाईलवरुन ऑर्डर केल्या दीड लाखाच्या भलत्याच वस्तू; ऑर्डर घरी पोहोचताच शॉक झाली आई
2 वर्षाच्या मुलाने मोबाईलवरुन ऑर्डर केल्या दीड लाखाच्या भलत्याच वस्तू; ऑर्डर घरी पोहोचताच शॉक झाली आई
एका भारतीय जोडप्याच्या 22 महिन्यांच्या मुलाने घरी 1.5 लाख रुपयांचं फर्निचर ऑर्डर केलं. पालकांना ही बाब तेव्हा समजली, जेव्हा त्यांच्या घरी फर्निचर डिलिव्हर होऊ लागलं.
नवी दिल्ली 24 जानेवारी : आजकाल सामानाची अगदी सहज घरपोच ऑनलाईन डिलिव्हरी (Online Delivery) दिली जाते. यामुळे अनेकदा याचा भरपूर फायदा होता. मात्र, यासोबतच यात रिस्कही तितकीच आहे. आम्ही हे यासाठी सांगत आहोत, कारण न्यू जर्सीमध्ये राहणाऱ्या एका लहान मुलाने आपल्या आईच्या फोनवरुन असं काही केलं, जे वाचून सगळेच पालक थक्क होतील (Toddler orders Furniture from Mother’s Phone) .
अनेकदा असा सल्ला दिला जातो, की मोबाईल आणि टॅबलेट मुलांच्या हाती येणार नाही, अशा ठिकाणी ठेवा. मात्र अनेक पालक याकडे दुर्लक्ष करतात. न्यू जर्सीमध्ये राहणाऱ्या एका भारतीय जोडप्याकडूनही हिच चूक झाली आणि त्यांच्या 22 महिन्यांच्या मुलाने घरी 1.5 लाख रुपयांचं फर्निचर ऑर्डर केलं. पालकांना ही बाब तेव्हा समजली, जेव्हा त्यांच्या घरी फर्निचर डिलिव्हर होऊ लागलं.
फॅक्ट्रीतून निघाला अन् घरी पोहोचेपर्यंतच झाला करोडपती; काही तासातच पालटलं नशीब
मधू आणि प्रमोद कुमार नावाच्या भारतीय जोडप्याच्या 2 वर्षाच्या अयांश नावाच्या मुलाने हे सर्व केलं आहे. अजून त्याला वाचायला किंवा लिहायला येत नसलं, तरी त्याला ऑनलाईन सामान ऑर्डर करायला आलं. अयांशने काहीही विचार न करता आपल्या आईच्या फोनवरुन दीड लाख रुपयांचं फर्निचर घरी मागवलं.
झालं असं की अयांशच्या आईने ऑनलाईन शॉपिंग साईटवर एक कार्ट बनवलं होतं. यात 1.4 लाखाचं वेगवेगळं फर्निचर शॉर्टलिस्ट करण्यात आलं होतं. अयांशने मोबाईल हातात घेऊन खेळताना कार्टमधील सर्व फर्निचर घरी ऑर्डर केलं. घरी सामान डिलिव्हर व्हायरल सुरुवात झाल्याने महिलेनं आपलं शॉपिंग अकाऊंट चेक केलं. तिला लगेचच समजलं की आपण शॉर्टलिस्टेड केलेलं सर्व फर्निचर घरी डिलिव्हर होत आहे.
हा मुलगा आपल्या आई-वडील आणि भाऊ-बहिणीच्या स्क्रीन अॅक्टिव्हिटीजवर नजर ठेवत असे. NBC च्या रिपोर्टनुसार, मुलाने इथूनच स्क्रीन स्वॅप आणि टॅप करणं शिकलं. मुलाच्या या कारनाम्यानंतर आई-वडिलांनी फोनच्या पासवर्डवर सर्वाधिक लक्ष दिलं आणि सुक्योरिटी सेटिंग्स वाढवली. जेणेकरून आता तो सहज फोन सुरू करू शकत नाही.
Published by:Kiran Pharate
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.